रजिस्टरवर शिक्के मारण्यासाठी पैसे मागितले, एक्ससाईज निरीक्षकासह तिघे 'एसीबी'च्या ताब्यात

By रवींद्र देशमुख | Published: April 6, 2023 06:25 PM2023-04-06T18:25:43+5:302023-04-06T18:25:50+5:30

नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने बार अँड रेस्टॉरंटच्या स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टरवर शिक्के मारण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना एक्साईजच्या निरीक्षकासह तिघांवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

Demanded money for stamping on register, Excise inspector and three arrested by 'ACB' | रजिस्टरवर शिक्के मारण्यासाठी पैसे मागितले, एक्ससाईज निरीक्षकासह तिघे 'एसीबी'च्या ताब्यात

रजिस्टरवर शिक्के मारण्यासाठी पैसे मागितले, एक्ससाईज निरीक्षकासह तिघे 'एसीबी'च्या ताब्यात

googlenewsNext

सोलापूर :

नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने बार अँड रेस्टॉरंटच्या स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टरवर शिक्के मारण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना एक्साईजच्या निरीक्षकासह तिघांवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

निरिक्षक संभाजी साहेबराव फडतरे, कॉस्टेबल प्रियंका बबन कुटे, सहा. दुय्यम निरीक्षक सिद्धाराम अंदेनप्पा बिराजदार असे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे बार अँड रेस्टॉरंट असून, त्याचे स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टरमध्ये नवीन आर्थिक वर्षासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग येथून शिक्के मारून घेण्यासाठी (प्रमाणित करून)  विभागातील प्रियांका कुटे व बिराजदार यांनी स्वतःसाठी व साहेबांसाठी चार हजारांची लाचेची मागणी केली. निरीक्षक फडतरे यांनी सदर लाच रक्कमेमध्ये तडजोड करून तीन हजार रुपये रक्कम कुटे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर गुरूवारी सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये कुटे यांनी लाच रक्कम स्वीकारली. याप्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Demanded money for stamping on register, Excise inspector and three arrested by 'ACB'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.