कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन मांगी, कुंभेज तलावात पाणी सोडा; संघर्ष समितीची मागणी
By admin | Published: May 5, 2014 08:16 PM2014-05-05T20:16:05+5:302014-05-06T17:17:24+5:30
करमाळा :
करमाळा :
करमाळा तालुक्याच्या हक्काचे म्हणजेच कुकडीचे पाणी टंचाईच्या परिस्थितीत मांगी व कंुभेज तलावात सोडावे या प्रमुख मागणीसाठी आज येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व कुकडी संघर्ष समितीच्या वतीने प्रचंड घोषणाबाजीत दीड तास धरणे आंदोलन करण्यात आले.
करमाळा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाणवू लागली असून, ४० गावांतून पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मांगी तलावाखालील १६ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होण्यास दीड महिना बाकी असून, त्याकरिता कुकडी धरणातून मांगी तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे व कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुजित बागल यांनी केले. या आंदोलनात पं.स.चे माजी सभापती बापूराव गायकवाड, बाजार समितीचे संचालक दादासाहेब जाधव, बाळासाहेब गायकवाड, अण्णा सुपनवर, प्रमोद कुलकर्णी,ॲड़ शिवाजीराव मांगले, गोवर्धन करगळ, संभाजीराजे बागल, बाळासाहेब बागल, दिवाण बागल, अण्णासाहेब बागल, हनुमंत बागल,विलास बरडे,गणेश नरसाळे,उमेश बागल,आनंद भांडवलकर आदींसह मांगी,रावगाव,भोसे,हिवरवाडी,वडगाव भागातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी पं.स.चे माजी सभापती बापूराव गायकवाड, महेश चिवटे यांची भाषणे झाली. यावेळी तहसीलदार राजंेद्र पोळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस यांनी बंदोबस्त ठेवला होता. वार्ताहर
चौकट घेणे
पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याबिगर राहणार नाही, कुकडीचे पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर दिल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
कोट करणे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार गतवर्षी वीज बंद काळातील वीज बिल माफ करून बिले दुरूस्त करून शेतकर्यांना देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला असून मान्यता मिळताच शेतकर्यांना गतवर्षीचे वीज बिल कमी करून नवीन बिल तयार करून दिले जाईल, असे वीज वितरण कं.चे सहायक अभियंता पोपटराव चव्हाण यांनी सांगितले.