पोखरापूर, सारोळे येथे हुमणी प्रतिबंधक उपाय प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:17 AM2021-06-04T04:17:55+5:302021-06-04T04:17:55+5:30

कुरूल : शेतकऱ्यांवर सध्या वेगवेगळ्या प्रकारची संकटे येत आहेत. त्यामुळे हुमणी किडे कसे मारावयाचे, प्रकाश सापळा लावणे आणि नियंत्रण ...

Demonstration of Humani Prevention Measures at Pokhara, Sarole | पोखरापूर, सारोळे येथे हुमणी प्रतिबंधक उपाय प्रात्यक्षिके

पोखरापूर, सारोळे येथे हुमणी प्रतिबंधक उपाय प्रात्यक्षिके

Next

कुरूल : शेतकऱ्यांवर सध्या वेगवेगळ्या प्रकारची संकटे येत आहेत. त्यामुळे हुमणी किडे कसे मारावयाचे, प्रकाश सापळा लावणे आणि नियंत्रण आणणे तसेच खरीप हंगामामध्ये मका, तूर या बियाणांची पेरणीपूर्व बीजप्रक्रिया त्याचे प्रात्यक्षिक कृषी पर्यवेक्षक जे. एस. भडकवाड, कृषी सहायक विनायक लांबतुरे व प्रमिला पाटील यांनी करून दाखविले.

मोहोळ तालुक्यातील पोखरापूर आणि सारोळे या गावांमध्ये शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना खरीप हंगाम पेरणीपूर्व मका आणि तूर यांची उगवण क्षमता याचे प्रयोग व पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करून दाखविण्यात आली.

यावेळी तालुका कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. मका व तूर यांचे पीक कसे घ्यावे, उत्पादन क्षमता कशी वाढवावी, त्यासाठी कोणत्या खतांचा वापर करायचा, याची माहिती दिली.

----

फोटो : ०२ हुमणी

पोखरापूर, सारोळेत हुमणी प्रतिबंधक उपायाचे प्रात्यक्षिक दाखविताना जे. एस. भडकवाड, कृषी सहायक विनायक लांबतुरे व श्रीमती प्रमिला पाटील.

Web Title: Demonstration of Humani Prevention Measures at Pokhara, Sarole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.