गाडेगावात पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:16 AM2021-06-03T04:16:39+5:302021-06-03T04:16:39+5:30
बार्शी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागही सक्रिय बनला आहे. तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत मंडल कृषी अधिकारी कार्यालय, बार्शीच्यावतीने कार्यक्षेत्रातील ...
बार्शी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागही सक्रिय बनला आहे. तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत मंडल कृषी अधिकारी कार्यालय, बार्शीच्यावतीने कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात बी. बी. एफ. पेरणी यंत्राचे फायदे प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आले.
गाडेगाव येथे या यंत्राची चाचणी करून दाखवली़. या यंत्राद्वारे पेरणी केल्यास खत व बियाणे एकाचवेळी पेरणी करता येते. रुंद वरंबा सरी पध्दतीमुळे पाऊस खंड कालावधीत सरीतील ओलावा मिळतो व पीक टिकून राहते. आंतरमशागतीची कामेदेखील करता येतात. या पध्दतीमुळे बियाण्यांची उगवण चांगली होते. तसेच बियाण्याची १५ ते २० टक्के बचत होते.
या यंत्राद्वारे प्रतिदिन ३ ते ४ हेक्टर पेरणी करता येते. उत्पादनातही वाढ होते. या यंत्राद्वारे सोयाबीन, मूग, उडीद, तूर, भुईमूग आदी पिकांची पेरणी करता येते. हे प्रात्यक्षिक प्रमोद जाधव यांच्या शेतात करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, मंडल कृषी अधिकारी जीवन जगदाळे, कृषी सहाय्यक निशिकांत आगलावे उपस्थित होते.
----
०१बार्शी-पेरणी
---