राज्य सरकारच्या विरोधात माकपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 08:43 PM2022-12-26T20:43:22+5:302022-12-26T20:44:19+5:30
कामगारांना पूरक असे धोरण राबवावे, अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना यावेळी मागण्यांचे निवेदन दिले.
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर - राज्य सरकारच्या प्रस्तावित कामगारांच्या धोरणांचा निषेध नोंदवत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेटवर जोरदार निदर्शने झाली. यावेळी माकपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
कामगारांना पूरक असे धोरण राबवावे, अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना यावेळी मागण्यांचे निवेदन दिले. सिटूचे राज्य महासचिव ॲड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली.
कामगार विरोधी धोरण विधानसभेत मंजुरीसाठी येणार होते. या पार्श्वभूमीवर माकप कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता पूनम गेटवर निदर्शने केली. यावेळी माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, मुरलीधर सुंचू, व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, युसूफ मेजर, ॲड. अनिल वासम, बापू साबळे, सतीश निर्मल, डी.रमेश बाबू, दीपक निकंबे, बाबूलाल फनिबंद विक्रम कलबुर्गी, दाऊद शेख, अशोक बल्ला, मोहन कोक्कूल, अकील शेख, शकुंतला पानिभाते, बाबू कोकणे, बजरंग गायकवाड, आसिफ पठाण, इलियास सिद्धीकी, रफिक काझी, किशोर मेहता, श्रीकांत कांबळे, शहाबुद्दीन शेख, मोहन दुडम, विरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, गीता वासम, शाम आडम, अफसाना बेग, शहानवाज शेख आदी उपस्थित होते.