पोलीस पाटील, सरपंचासह नागिरकांना ग्रामसुरक्षा यंत्रणेची प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:23 AM2021-09-18T04:23:34+5:302021-09-18T04:23:34+5:30
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्ती ग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज ...
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्ती ग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार आहे. यामुळे गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणाचे संचालक डॉ. के. गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेची प्रात्यक्षिके दाखविली.
हा कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशील भोसले यांनी पार पडला. या कार्यक्रमास सर्व गावातील मान्यवर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये
संपूर्ण भारतासाठी टोल फ्री नंबर एकच आहे. या यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो. संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजात संदेश कॉल परिसरातील नागरिकांना मिळतो. घटनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण समजल्याने गावकऱ्यांना योग्य ती मदत करता येते. वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरात सर्व दिशांना जातो.
----