सातव्या वेतन आयोगासाठी सोलापूर महापालिकेत कामगारांची निदर्शने
By Appasaheb.patil | Published: August 3, 2019 02:37 PM2019-08-03T14:37:25+5:302019-08-03T14:40:36+5:30
महापौर, आयुक्तांना दिले निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास १५ आॅगस्टनंतर बेमुदत संपाचा दिला इशारा
सोलापूर : सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी सफाई कामगारांनी शनिवारी सोलापूर महापालिकेत निदर्शने केली. १५ आॅगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १५ आॅगस्टनंतर बेमुदत संपाचा इशाराही यावेळी कृती समितीच्या पदाधिकाºयांनी दिला.
भाजप सरकारची सत्ता महापालिकेत आल्यापासून महापालिकेत काम करणाºया कामगार व कर्मचाºयांसाठी कोणतेही ठोस असे उल्लेखनीय मागण्याबाबत घोषणा केलेली नाही. शहरात जन्मलेल्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ही सर्व प्रकारच्या सेवा देणाºया कामगारांसाठी त्यांच्या मागण्याबाबत महापालिका पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी उदासिनता का दाखवितात असा सवाल कामगार नेते अशोक जानराव यांनी उपस्थित केला.
यावेळी सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव, कार्याध्यक्ष डी़ एस़ म्हेत्रे, कोषाध्यक्ष अजय क्षीरसागर, सरचिटणीस प्रदीप जोशी आदी कामगार कृती समितीचे पदाधिकारी, मान्यवर व कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
या आहेत मागण्या...
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे महापालिका कामगारांना सातवा वेतन लागू करण्याची घोषणेचा आदेश व्हावा
- राज्य शासनाप्रमाणे १४८ टक्के महागाई भत्ता लागू करावा
- बालवाडी शिक्षिका, सेविकेच्या मानधनात १००० रूपये वाढ करावी
- रोजंदारी बदली कामगार व घंटा गाडीवरील सर्व कामगारांना किमान वेतन दर लागू करावा
- भवानी राम सिकची धर्मशाळा त्वरीत चालू करून कामगारांना काम द्यावे़
- रोजंदारी बदली कामगारांची प्रतिक्षा यादी जाहीर करावी
- रोजंदारी सेवकांना त्वरीत कायम करण्यात यावे