डेंग्यूने घेतला शिक्षिकेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:38+5:302021-09-08T04:28:38+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतेक गावांत ताप, थंडी, सर्दी, खोकला व हात-पायदुखीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र याकडे आरोग्य ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतेक गावांत ताप, थंडी, सर्दी, खोकला व हात-पायदुखीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र याकडे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतींनी गांभीर्याने पाहिले नाही. यामुळेच नान्नज येथील महिलेला जीव गमवावा लागला. नान्नज व कोंडी येथे येथे डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे तालुका आरोग्य अधिकारी मोहन शेजार यांनी सांगितले. तर उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बीबीदारफळ येथील एका इसमावर डेंग्यूचे उपचार सुरू असल्याचे सांगितले.
मीनाक्षी तोडकर या महिलेला त्रास सुरू झाल्याने सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र तिचा मृत्यू झाला.
बेलाटी, हिरज, खेड, कळमण, कौठाळी या पाच ग्रामपंचायतींनी जंतूनाशक फवारणी केली असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसात सर्वच गावे फाॅगिंग मशीनने फवारणी करून घेतली जातील, असे बीडीओ प्रशांत देशमुख यांनी सांगितले. नागरिकांनी डासांची उत्पत्ती होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी मोहन शेगार यांनी केले आहे.
----
ग्रामसेवकांविना गाव
- गेल्या अनेक महिन्यांपासून गावचा कारभार ग्रामसेवकाविना सुरु आहे. यामुळे गावातील स्वच्छता, पाणीपुरवठ्याचे काम ठप्प झाले आहे. एवढी मोठी घटना घडूनही पंचायत समिती प्रशासन नान्नज गावाकडे फिरकले नाही. मात्र काही तरुणांनी सरपंच राणी टोणपे यांना दूरध्वनीवरुन फवारणी कधी करणार अशी विचारणा केली.
-----