‘युटोपियन’कडून पोळ्यासाठी प्रतिटन ५० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:26 AM2021-09-05T04:26:49+5:302021-09-05T04:26:49+5:30

मंगळवेढा : कचरेवाडी (ता. मंगळवेढा) येथील युटोपियन शुगर्स या साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या उसास प्रतिटन ...

Deposit of Rs. 50 per tonne from Utopian to farmers' bank accounts | ‘युटोपियन’कडून पोळ्यासाठी प्रतिटन ५० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

‘युटोपियन’कडून पोळ्यासाठी प्रतिटन ५० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

Next

मंगळवेढा : कचरेवाडी (ता. मंगळवेढा) येथील युटोपियन शुगर्स या साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या उसास प्रतिटन ५० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.

युटोपियन शुगर्सने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ५ लाख ३ हजार ८१३ मे. टन उसाचे गाळप केले आहे. गळीतास आलेल्या उसाचे प्रति मे. टन ५० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम रुपये २ कोटी ५१ लाख ९० हजार ६६५ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३ सप्टेंबर रोजी जमा केली आहे.

ऊस उत्पादकांना उसाचे पीक चांगल्या पद्धतीने वाढविण्यासाठी कोरोना काळात शेतकऱ्यांची आर्थिक गरज ओळखून पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार युटोपियन कारखाना वाटचाल करीत असल्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी सांगितले.

Web Title: Deposit of Rs. 50 per tonne from Utopian to farmers' bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.