९३ दिव्यांगांच्या बँक खात्यावर साडेपाच लाख रुपये जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:28+5:302021-07-04T04:16:28+5:30
मागील वर्षीपासून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसार व प्रादुर्भावामुळे दिव्यांग नागरिक हलाखीच्या परिस्थितीतून जात आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा ...
मागील वर्षीपासून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसार व प्रादुर्भावामुळे दिव्यांग नागरिक हलाखीच्या परिस्थितीतून जात आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने सांगोला नगरपरिषदेकडे अर्थसाहाय्य मिळण्याबाबत लेखी निवेदन प्राप्त झाले होते. यानुसार सांगोला नगरपरिषदेमार्फत ९३ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे ५ लाख ५८ हजार त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यामध्ये जमा केल्याचे नगराध्यक्षा राणी माने, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.
हा निधी पाठविण्यासाठी लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन कागदपत्रे जमा करणे, बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून दिव्यांगांचे बँक खाते सुरू असलेबाबत खात्री करणे यासह इतर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी कर निरीक्षक तृप्ती रसाळ, सहा. मालमत्ता पर्यवेक्षक स्वप्निल हाके, लेखापरीक्षक विजय कन्हेरे यांनी परिश्रम घेतले.