कृषी कायदे रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:20 AM2021-03-07T04:20:23+5:302021-03-07T04:20:23+5:30
यावेळी अभिमान जगताप, कल्याण लांडगे, विजय बनसोडे, अभिजीत गायकवाड, नागेश सातपुते, जितेंद्र साळवे, अशोक सावंत, उमेश जगताप, शकील शेख, ...
यावेळी अभिमान जगताप, कल्याण लांडगे, विजय बनसोडे, अभिजीत गायकवाड, नागेश सातपुते, जितेंद्र साळवे, अशोक सावंत, उमेश जगताप, शकील शेख, काझी, विकास कांबळे, बंटी चंदनशिवे, संदीप घाडगे, गोपाळ घाडगे, अजित नाईकनवरे, डॉ. सुरेश धाईंजे, विजय बनसोडे, सौरभ वाघमारे आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी कृषी कायदा अंमलात आणला. हे कायदे महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसान करणारे कायदे आहेत. खासगी कंपन्यांना उभारी देणारे कायदे आहेत. बाजार समितीबाहेर विक्री झाल्याने, बाजार शुल्क न मिळाल्याने राज्याचे नुकसान होईल. साठेबाजीला वाव मिळेल. किमान आधारभूत किमत यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल. कृषी करार कायदा हा कंत्राटी शेतीला खतपाणी घालणारा कायदा आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक लहान शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे. हे सर्व कायदे रद्द व्हावे, यासाठी वंचित बहुजन आघाडी माळशिरस तर्फे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.