बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वंचितची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:38 AM2020-12-12T04:38:21+5:302020-12-12T04:38:21+5:30

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पालकमंत्री दत्ता भरणे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटून करमाळा तालुक्यात हैदोस घालणा-या ...

Deprived demand for leopard control | बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वंचितची मागणी

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वंचितची मागणी

Next

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पालकमंत्री दत्ता भरणे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटून करमाळा तालुक्यात हैदोस घालणा-या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा आणि अतिवृष्टीतील बाधित शेतक-यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक आनंद चंदनशिवे व गोपाल घार्गे - देशमुख यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री भरणे यांची भेट घेऊन ही मागणी केली. गेल्या काही दिवसात करमाळा तालुका व परिसरात बिबट्याच्या हल्यात तीन व्यक्तींचा बळी गेला. बिबट्याचा बंदोबस्त करावा याविषयी करमाळा तालुक्यातील हिवरे गावातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हाळ यांनी पालकमंत्री दत्ता भरणे व जिल्हाधिकारी मिंलिद शंभरकर यांच्या बरोबर चर्चा केली. अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रती हेक्टरी १० हजार रुपये तुटपुंजी मदत वाढवून प्रती हेक्टरी ५० हजार रुपये द्यावी अशी यावेळी मागणी करण्यात आली.

यावेळी उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष कुमार वाघमारे, जिल्हा कोषाध्याक्ष बबन शिंदे, माढा विभाग कोषाध्याक्ष अभिमान जगताप, बाबूराव बनसोडे, विजय बनसोडे, जगन्नाथ झंजे, विनायक सावंत उपस्थित होते.

----

फोटो : ११ चंदनशिवे

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे बिबट्याच्या बंदोबस्तची मागणी करताना आनंद चंदनशिवे, गोपाल घार्गे-देशमुख, कुमार वाघमारे.

Web Title: Deprived demand for leopard control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.