सोलापूर जिल्ह्यातील ऊसाच्या फडातही देशमुख शाहीचे राजकारण सहकारमंत्री: आठ दिवसांनी बैठक; पालकमंत्री: उद्याच घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:11 PM2017-11-07T13:11:10+5:302017-11-07T13:15:17+5:30

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दराबाबत कोल्हापूरमध्ये रविवारी काढलेला तोडगा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना मान्य नाही.  सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातही बैठक झाली पाहिजे, अशी शेतकरी संघटनांच्या नेत्यांची मागणी आहे.

Deshmukh Shahi's Political Cooperation Minister in Sugar Fodder of Solapur District: Meeting in eight days; Guardian Minister: Take it tomorrow | सोलापूर जिल्ह्यातील ऊसाच्या फडातही देशमुख शाहीचे राजकारण सहकारमंत्री: आठ दिवसांनी बैठक; पालकमंत्री: उद्याच घेऊ

सोलापूर जिल्ह्यातील ऊसाच्या फडातही देशमुख शाहीचे राजकारण सहकारमंत्री: आठ दिवसांनी बैठक; पालकमंत्री: उद्याच घेऊ

Next
ठळक मुद्देसहकारमंत्र्यांवर वेळकाढूपणाचा आरोप करीत शेतकरी संघटना संतापल्या साखर कारखानदार यांच्यात संघर्षाची चिन्हेपालकमंत्री म्हणाले, उद्याच बैठक लावू 


राकेश कदम
सोलापूर दि ७ : साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दराबाबत कोल्हापूरमध्ये रविवारी काढलेला तोडगा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना मान्य नाही.  सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातही बैठक झाली पाहिजे, अशी शेतकरी संघटनांच्या नेत्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू न तत्काळ बैठक घेण्याची तयारी दर्शविली आहे तर सहकारमंत्र्यांनी १३ नोव्हेंबरची वेळ दिली आहे. सहकारमंत्र्यांवर वेळकाढूपणाचा आरोप करीत शेतकरी संघटना अधिकच संतापल्या आहेत. पालकमंत्री देशमुख यावर काय डाव टाकतात याकडे लक्ष आहे. 
राज्यातील साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबरपासून ऊस गाळपास सुरुवात केली आहे. ऊस दरावरून अनेक ठिकाणी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात संघर्षाची चिन्हे आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून रविवारी कोल्हापुरात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. तीत एफआरपी अधिक २०० रुपये देण्यावर एकमत झाले. त्यामुळे राज्यभरातील ऊसदराची कोंडी फुटली, असे वाटत होते, परंतु सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी हा तोडगा मान्य केलेला नाही. 
स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना अशा विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन याप्रश्नी पुढाकार घेण्याची विनंती केली. 
-------------------
पालकमंत्री म्हणाले, उद्याच बैठक लावू 
च्पालकमंत्र्यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर उतारा, उसाचे वजन यात घोळ घातले जात असल्याच्या तक्रारी केल्या. गेल्यावर्षी साखर दर कोसळलेले असतानाही कारखानदारांनी २५०० रुपयांची पहिली उचल दिली होती. आता ते साखर उताराच कमी दाखवत आहेत. त्यामुळे आम्हाला प्रतिटन जास्तीत जास्त २१०० रुपये मिळतील. ही फसवणूक आहे. यंदा साखरेला क्विंटलमागे ३३०० रुपये मिळत असल्याने उसाला टनामागे ३ हजार रुपये मिळालेच पाहिजेत. त्यावर पालकमंत्र्यांनी वजन मापे प्रशासन, उत्पादन शुल्क अशा विविध खात्यांसोबत उद्याच बैठक लावतो, असे आश्वासन दिले. आमदार प्रशांत परिचारक यांनाही फोन लावला. परिचारकांनी त्यांना यात सहकारमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालून तोडगा काढू, असे आश्वासन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले. 
-------------------
सहकारमंत्री म्हणाले, लवकर हवे असेल तर मुंबईला या 
च्शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची त्यांच्या सोलापुरातील कार्यालयात जाऊन भेट घेतली. ‘बापू , तुम्हीही कारखानदार आहात. तुम्हीच पहिली उचल जाहीर करू न आदर्श ठेवा’, अशी विनंती केली. साखरेचा दर, साखर उताºयाचा घोळ असे विषयही कानावर घालून तोडग्यासाठी बैठक बोलवा, अशी मागणी केली. सहकारमंत्र्यांनी एक आठवड्यानंतरची वेळ दिली. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एवढा उशीर नको. लवकर बैठक घ्या, असे म्हणताच लवकर हवे असेल तर मुंबईला या, असे सांगितले. त्यामुळे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी संतापून बाहेर पडले.
-----------------------
मुख्यमंत्री लक्ष घालतील
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ऊसदर, साखर उताºयाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. यावर लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरूच राहील. 
- दीपक भोसले, 
रयत क्रांती संघटना, सोलापूर.  
------------------------
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडायला हवी                होती, परंतु ते वेळकाढूपणा करीत आहेत. ते साखर कारखानदार असल्यामुळे शेतकºयांच्या हिताचा निर्णय घेतील, असे वाटत नाही. तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. 
- संजय पाटील-घाटणेकर, प्रदेशाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना. 

Web Title: Deshmukh Shahi's Political Cooperation Minister in Sugar Fodder of Solapur District: Meeting in eight days; Guardian Minister: Take it tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.