बंदी असतानाही शहरात दोन ट्रक घुसले
By admin | Published: April 20, 2015 01:03 PM2015-04-20T13:03:45+5:302015-04-20T13:08:40+5:30
ठराविक वेळेत शहरात जडवाहतुकीस बंदी असतानाही त्याचा आदेश मोडत ट्रकचालकाने ट्रक घुसवल्याचा प्रकार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर शनिवारी सकाळी साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला
सोलापूर : ठराविक वेळेत शहरात जडवाहतुकीस बंदी असतानाही त्याचा आदेश मोडत ट्रकचालकाने ट्रक घुसवल्याचा प्रकार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर शनिवारी सकाळी साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.
शहरातील वाढत्या अपघाताचा विचार करून ठराविक वेळेत म्हणजे सकाळी ७ ते दुपारी १ आणि सायंकाळी साडेतीन ते रात्री १0 पर्यंत शहरात जडवाहतुकीला बंदी आहे. असे असतानाही वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांची नजर चुकवून एमएच-१२/एफसी-७६0६ आणि एमएच-१२/एफसी-७३८७हे दोन ट्रक शहरात घुसले. हा प्रकार लक्षात येताच दोन्ही गाड्या पोलिसांनी अडवल्या. जडवाहतुकीच्या बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी महेश विश्वनाथ चव्हाण (रा. सोलापूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. राजू मुरलीधर वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तपास अनंतकळस करीत आहेत. (प्रतिनिधी) तरीही पोलीस चिडीचूप ■ बंदी कालावधीत काही वाहनांना प्रवेश दिला जातो. याबाबत 'लोकमत'ने स्टिंग ऑपरेशन केले होते. तरीही पोलीस चिडीचूप असल्याचेच या घटनेवरून दिसते आहे.