विरोध असतानाही अखेर तालुका पोलीस ठाण्याचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:04+5:302020-12-29T04:22:04+5:30

बार्शी तालुक्यात पूर्वी बार्शी शहर, पांगरी व वैराग ही तीन पोलीस ठाणे होती. यामध्ये कित्येक गावांना पांगरी व ...

Despite the protests, the taluka police station was finally relocated | विरोध असतानाही अखेर तालुका पोलीस ठाण्याचे स्थलांतर

विरोध असतानाही अखेर तालुका पोलीस ठाण्याचे स्थलांतर

Next

बार्शी तालुक्यात पूर्वी बार्शी शहर, पांगरी व वैराग ही तीन पोलीस ठाणे होती. यामध्ये कित्येक गावांना पांगरी व वैराग हे पोलीस ठाणे लांब पडत असल्याने या दोन पोलीस स्टेशनसह हर हद्दीत असलेल्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन तालुका पोलीस ठाणे करावे, अशी मागणी गेल्या होती. त्यानुसार शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या व पूर्वी शहर पोलीस ठाणे असलेल्या सरकारी जागेत हे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. याठिकाणी अडीच वर्षे कामकाज केल्यानंतर ही इमारत केव्हा ही पडण्याचा धोका असल्याने त्याचे स्थलांतर करण्यात आले. आज नव्या इमारतीमधूनच कामकाज सुरू केल्याचे सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी सांगितले.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावे

शेलगाव (मा), जामगाव (आ), भोयरे, ताडसौंदणे, वानेवाडी, शेलगाव (व्हळे), गाडेगाव, कांदलगाव, खडकलगाव, मांडेगाव, बेलगाव, उंबरगे, बावी (आ), तावडी, आरणगाव, बाभूळगाव, आगळगाव, कुसळंब, धोत्रे, बोरगाव, चारे, चुंब, धामणगाव, धानोरे, कोरेगाव, पाथरी, खडकोणी, धनगरवाडी, भानसळे, देवगाव (मा), पिंपळगाव (धस), काटेगाव, खांडवी, अलिपूर, शेंद्री, गाताचीवाडी, उपळाई ठोंगे, वांगरवाडी, कासारवाडी, बळेवाडी, कव्हे, कोरफळे, दडसिंगे, सौदरे, फपाळवाडी, लक्ष्याची वाडी, तावरवाडी, भोईंजे, श्रीपतपिंपरी, गोडसेवाडी, कोरफळे, मालवंडी, गुळपोळी, तुर्क पिंपरी, सुर्डी, उंडेगाव, रस्तापूर, पानगाव, नागोबाचीवाडी या गावांचा समावेश आहे.

फोटो

२८ बार्शी तालुका पोलीस ठाणे

Web Title: Despite the protests, the taluka police station was finally relocated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.