साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई होऊनही, शेतकरी रिकामाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:00+5:302021-06-03T04:17:00+5:30

सत्तेच्या दबावापोटी या साखरसम्राटांवर तहसीलदार कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. त्यामुळे दुसरा हंगाम आला तरी मागीलवर्षीच्या उसाची बिले तोडणी ...

Despite RRC action on sugar mills, farmers remain empty | साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई होऊनही, शेतकरी रिकामाच

साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई होऊनही, शेतकरी रिकामाच

Next

सत्तेच्या दबावापोटी या साखरसम्राटांवर तहसीलदार कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. त्यामुळे दुसरा हंगाम आला तरी मागीलवर्षीच्या उसाची बिले तोडणी वाहतूक व कामगारांच्या पगारी शेतकऱ्यांना मिळत नाहीत. आधीच कोरोनाचे संकट आहे. पावसाळा सुरू होत असून शेतीच्या मशागतीच्या काळात केवळ पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड खत-पाणी करणे, शेतीची मशागत करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्व साखर कारखानदारांनी त्वरित बिले द्यावीत. सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात दोनवेळा आरआरसीसी कारवाई करणे ही घटना पहिल्यांदा घडलेली आहे. तरीही प्रशासनातील अधिकारी राजकीय दबावापोटी गप्प आहेत का ? असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होऊ लागलेला आहे. येत्या १० तारखेपर्यंत शेतकऱ्यांना सर्व उसाची बिले मिळाली नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन शेतकरी संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, सचिन पाटील, शहाजहान शेख, शेतकरी लंगुटे उपस्थित होते.

Web Title: Despite RRC action on sugar mills, farmers remain empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.