कोरोना वॉर्डात जन्मलेल्या दोन बाळांचा आईच्या कुशीवरील विश्वास पाहून नियतीही खुदकन् हसली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 11:24 AM2020-06-08T11:24:06+5:302020-06-08T11:27:42+5:30

कोरोनामुक्त; १३ दिवसांच्या नवजात शिशूंनी कोरोनावर मात केली

Destiny laughed when she saw the faith of two babies born in Corona Ward in their mother's arms! | कोरोना वॉर्डात जन्मलेल्या दोन बाळांचा आईच्या कुशीवरील विश्वास पाहून नियतीही खुदकन् हसली !

कोरोना वॉर्डात जन्मलेल्या दोन बाळांचा आईच्या कुशीवरील विश्वास पाहून नियतीही खुदकन् हसली !

Next
ठळक मुद्देशासकीय रुग्णालयातून तेरा दिवसांच्या दोन चिमुरड्यांनी कोरोनावर मात केलीआतापर्यंत सर्वांत कमी वयाची ही मुले आहेत,  यामुळे लोकांनी कोरोनाची भीती बाळगू नये

सोलापूर : कोरोनाने देशभरात मोठा हाहाकार माजवत अनेकांचे बळी  घेतले आहेत; पण अशा कोरोना व्हायरसवर जन्मताच दोन चिमुकल्यांनी विजय मिळवला़  या चिमुरड्यांना त्यांच्या मातांसह घरी सोडण्यात आले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नीलम नगर आणि अंबिका नगर, विडी घरकूल येथील अशा दोन कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिला दाखल झाल्या...त्यांनी २६ मे रोजी त्या दोघींनी दोन गोंडस मुलांना जन्म दिला... दुर्दैवाने या दोन्ही चिमुकल्यांना जगात पाऊल टाकतानाच कोरोनाची लागण झाली होती.

मुले जन्माच्या तिसºया दिवशी त्यांची स्वॅब टेस्ट ही पॉझिटिव्ह आली.़ मातासह मुलेही पॉझिटिव्ह असल्यामुळे  त्यांची विशेष काळजी घेण्यात आली़ पण मुलांच्या वजनाप्रमाणे मुलांना अ‍ॅन्टी बायोटिक देण्यात आले़ याचबरोबर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले.  याचबरोबर आईच्या दुधामुळे दोन्ही मुलांनी कोरोनाशी   लढा देत राहिले़ यामुळेच या १३ दिवसांच्या नवजात शिशुंनी कोरोनावर मात केली.

दोन्ही मातांचे चार दिवसांपूर्वीच म्हणजेच बुधवारी कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते़; पण मुलांसाठी त्या मातांनाही थांबवण्यात आले होते. रविवारी त्यांना डिस्चार्ज देताना त्या सर्वांवर पुष्पवृष्टी करून घरी सोडण्यात आले. 

दोन्ही आया डॉक्टरना म्हणाल्या तुम्हीच नाव सूचवा !
- कोरोना वॉर्डात जन्मलेल्या या बालकांना आजारमुक्त झाल्यानंतर सिव्हिलमधील सर्वच कर्मचाºयांना आनंद झाला. रविवारी त्यांना समारंभपूर्वक घरी सोडण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी विडी कामगार असलेल्या या बालकांच्या मातांना, ‘तुम्ही बाळाचे नाव काय ठेवणार ? असे विचारले असता, त्यांनी ‘डॉक्टर तुम्हीच नाव सूचवा’ अशी विनंती केली.

२० माता कोरोनामुक्त होऊन घरी
- आजपर्यंत आयसोलेशन लेबर रुम व शस्त्रक्रिया गृहात १९९ कोरोना संशयित मातांची प्रसूती करण्यात आली असून, यापैकी २५ माता या कोरोनाग्रस्त आढळून आल्या. यापैकी २० मातांना कोरोनामुक्त करुन घरी पाठविले आहे. तर ५ माता या उपचार घेत असल्याची माहिती स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. तिरणकर यांनी दिली.

शासकीय रुग्णालयातून तेरा दिवसांच्या दोन चिमुरड्यांनी कोरोनावर मात केली़ आतापर्यंत सर्वांत कमी वयाची ही मुले आहेत़  यामुळे लोकांनी कोरोनाची भीती बाळगू नये़ पण स्वत:ची काळजी घ्यावी़
डॉ. औदुंबर मस्के, वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल हॉस्पिटल.

Web Title: Destiny laughed when she saw the faith of two babies born in Corona Ward in their mother's arms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.