हातभट्टीवर धाड टाकून दारू तयार करण्याचे रसायन नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:23 AM2021-05-07T04:23:29+5:302021-05-07T04:23:29+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी दोन वाजता मानवी आरोग्याला धोकादायक ठरणारी हातभट्टीची दारू तांबेवाडी येथील एका शेतात ...

Destroy the chemical used to make alcohol by raiding the kiln | हातभट्टीवर धाड टाकून दारू तयार करण्याचे रसायन नष्ट

हातभट्टीवर धाड टाकून दारू तयार करण्याचे रसायन नष्ट

Next

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी दोन वाजता मानवी आरोग्याला धोकादायक ठरणारी हातभट्टीची दारू तांबेवाडी येथील एका शेतात अवैधरीत्या काढली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी तत्काळ पोलिसांचे पथक तयार करून बुधवारी दुपारी २ वाजता छापा टाकला. यामध्ये हातभट्टी दारू काढण्यासाठी लागणारे रासायनिक युरिया खत, बॅटरीच्या सेलचे तुकडे, नवसागरचे बारीक तुकडे, दुर्गंधीयुक्त गूळमिश्रित कुजवलेले रसायन, झाडांच्या साली असे मिश्रण तयार करून भट्टीवर दारू काढण्याचे काम सुरू होते.

या वेळी पोलिसांनी छापा मारून तुकाराम मनोहर राठोड, गोरख राठोड, बाबा राठोड, राजेंद्र पवार, संजय राठोड यांना ताब्यात घेऊन एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनय बहिर, सपोनि महारुद्र परजने, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पोलीस ब्रह्मदेव वाघमारे यांच्या पोलीस पथकाने कारवाई केली.

----

Web Title: Destroy the chemical used to make alcohol by raiding the kiln

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.