अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी पाण्यात बुडवून नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:48+5:302021-03-18T04:21:48+5:30

निवासी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, महसूल नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडळ अधिकारी किरण खारव, रेवणनाथ वळेकर, तलाठी उमेश बनसोडे, ...

Destroy three illegal sand dredging boats | अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी पाण्यात बुडवून नष्ट

अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी पाण्यात बुडवून नष्ट

Next

निवासी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, महसूल नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडळ अधिकारी किरण खारव, रेवणनाथ वळेकर, तलाठी उमेश बनसोडे, मोहसिन हेड्डे, आनंदा डोणे, साईनाथ आडगटाळे, संजय शेटे, बाळासाहेब कांबळे, कोतवाल नितीन हत्तीकट, पोलीस पाटील अभिजीत वळसे, पोलीस कॉन्स्टेबल महेश बचुटे यांनी ही कारवाई केली.

दरम्यान या ठिकाणी झारखंड राज्यातील इमरान शेख, हानिफ शेख, नासीर शेख, कलू शेख हे चार कामगार आढळून आले.

त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असताना या बोटी विकास देवकर, तेजस सोनवणे, कुणाल खडके, गणेश लोंढे, बीजू साळुंके, गणेश इसगुडे सर्वजण रा.इंदापूर, जि. पुणे येथील रहिवासी यांच्या असल्याचे या कामगारांनी सांगितले.

सर्व कामगार व बोटी मालक यांच्याविरोधात मंडळ अधिकारी किरण खारव फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्यावर कलम ३७९/ ३५३/ ४३९, ३४ अन्वये गुन्हा दाखल नोंद करण्याचे काम सुरू होते.

फोटो

१७ करमाळा-क्राईम

ओळी : उजनी जलाशयात ढोकरी शिवारात बेकायदा वाळू उपसा बोटीवर महसूल पथकाने कारवाई केली.

Web Title: Destroy three illegal sand dredging boats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.