सिव्हील हॉस्पीटलचा निर्धार; प्लाझ्मा थेरपीसोबतच अत्याधुनिक पद्धतीने उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 11:09 AM2020-05-01T11:09:34+5:302020-05-01T11:11:08+5:30

दिलासादायक; आता सोलापुरातील अधिकाधिक 'कोरोना' बाधितरुग्ण लवकर बरे होतील

Determination of civil hospital; Sophisticated treatment with plasma therapy | सिव्हील हॉस्पीटलचा निर्धार; प्लाझ्मा थेरपीसोबतच अत्याधुनिक पद्धतीने उपचार

सिव्हील हॉस्पीटलचा निर्धार; प्लाझ्मा थेरपीसोबतच अत्याधुनिक पद्धतीने उपचार

Next
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीसोलापुरात संचारबंदी ची कडक अंमलबजावणी सुरूसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

शितलकुमार कांबळे

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय  (सिव्हील) हे आयसीएमआर (इंडियन कौन्सील आॅफ मेडिकल रिसर्च) यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार उपचार करते. आयसीएमआरने प्लाझ्मा थेरपीने उपचार मान्यता दिली आहे. राज्यामध्ये काही मोजक्या रुग्णालयात ही सुविधा देण्यात येणार असून यात सोलापुरातील सिव्हीाल हॉस्पीटलचा समावेश आहे. प्लाझ्मा थेरपीसोबतच अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्याचा सिव्हील हॉस्पीटलने निर्धार केल्याचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. औदुंबर मस्के यांनी सांगितले.


देशात प्लाझ्मा थेरपीने 'कोरोना' आजारावर उपचार काही दिवसांपासूनच करण्यात येत आहे. या पद्धतीने रुग्णामध्ये लवकर चांगल्या सुधारणा होतात. सिव्हाल हॉस्पीटलमधील रक्तपेढीत रक्तामधून प्लाझ्मा (रक्त घटक) वेगळ््या करण्याचे तंत्रज्ञान व तज्ञ उपलब्ध आहेत. याासाठी आयसीएमआर व राज्य शासन यांच्याकडे पाठपुरावा सुरु असून लवकरात लवकर ही अत्याधुनिक उपचार पद्धती सिव्हील हॉस्पीटलमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  गुरुवारी पहिले तीन रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी परतले असून येत्या काळात बºया होणाºया रुग्णांची संख्या वाढणार असल्याचा विश्वास रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला.


चीनमध्ये २७ डिसेंबरमध्ये 'कोरोना' आजाराची पहिली व्यक्ती आढळली होती. एप्रिल महिण्यामध्ये चीनमध्ये हा आजार आटोक्यात आला. आपल्याकडेही हा आजार जास्त वेळ असणार नाही. येथील नागरिक घाबरुन न जाता मास्क वापरणे, हात धुणे, शारिरिक अंतर राखणे याची जितकी जास्त चांगली काळजी घेतील, तितक्या लवकर यातून सुटका होण्याची शक्यता वाढते. जसजशी लोकांमधील रोगप्रतिकारक  शक्ती वाढेल तशी या आजाराची तिव्रता कमी होत जाईल.


शहरातील बहुतांश खासगी रुग्णालय बंद असताना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हील) रुग्णांच्या सेवेकरुत २४ तास खुले आहे. येथे येणाºया प्रत्येक रुग्णावर चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात येत आहेत. येथे येणारा प्रत्येक रुग्णाला कोरोना आजार तर नाही ना याची खातरजमा करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. प्रत्येक आजाराच्या तज्ञाचे लक्ष रुग्णालयात असणाºया फ्लू ओपीडीमध्ये असते. आॅपरेशन थिएटर, आॅक्सीजन यासोबतच रुग्णाची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार रु ग्णालयात देण्यात येत आहे.


'कोरोना' आजारापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोनाच्या काही रुग्णामध्ये कोणतीच लक्षणे आढळून आलेली नाही. या प्रकारचे रुग्ण हे हा आजार पसरवू शकतात. मात्र, आजाराचा फैलाव कुठून झाला हे कळणे अवघड जाते. म्हणून जोपर्यंत कोरोना आजार संपूर्णपणे जात नाही, तोपर्यंत मास्क वापरणे, हात धुणे यासारखे छोट्या वाटणाºया पण महत्वाच्या गोष्टींना सवयीचा भाग बनवावा लागेल.
----------------------------------------
डॉक्टरांपेक्षा नागरिकांची भूमिका महत्वाची
कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली तरी सिव्हील रुग्णालय प्रशासन त्यांच्यावर उपचार करण्यास सक्षम आहे. रुग्णांवर उपचार करणे हे डॉक्टरांचे पहिले कर्तव्य आहेय्. सध्याच्या परिस्थीतीत डॉक्टरांपेक्षा नागरिकांची भुमिका महत्वाची आहे. त्यांनी जर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले तर आजाराचा फैलाव होणार नाही. नागरिक जितके जास्त नियम पाळतील तितक्या लवकर लॉकडाऊन निघण्यास मदत होईल, असे जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक तथा सहाय्यक वैद्यकिय अधिक्षक डॉ. राजेश चौगुले यांनी सांगितले.

Web Title: Determination of civil hospital; Sophisticated treatment with plasma therapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.