ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावून देवपूजा, रक्षाबंधनास विरोध; विवाहितेची तक्रार
By विलास जळकोटकर | Published: August 23, 2023 06:48 PM2023-08-23T18:48:25+5:302023-08-23T18:48:36+5:30
लग्न झाल्यापासून आम्ही ख्रिश्चम धर्माचे आहोत तुलाही धर्म स्वीकारावा लागेल म्हणून ख्रिश्चम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले.
सोलापूर : लग्न झाल्यापासून आम्ही ख्रिश्चम धर्माचे आहोत तुलाही धर्म स्वीकारावा लागेल म्हणून ख्रिश्चम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले, घरात देवपूजा, रक्षाबंधन करण्यास वरोध केला. पतीने बँक खात्यावरील दीडलाखाची रोकड, दागिने काढून घेतले. तरीही नवीन घरासाठी पैसे आणण्यासाठी छळ होत असल्याची तक्रार पूजा आकाश आनंदे (वय- २२, रा. जुना बोरामणी नाका, रविवार पेठ, सोलापूर, सध्या ओमनमशिवाय नगर, सोलापूर) या विवाहितेचे पोलिसात दिली. यानुसार पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
यातील फिर्यादी पूजा आनंदे यांनी तक्रारी म्हटले आहे की, लग्न झाल्यापासून अनेक कारणावरुन मानसिक व शारीरिक छळ केला. ख्रिश्चम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. देवपूजा करण्यास विरोध केला. रक्षा बंधनसारखे सण साजरे करण्यासही विरोध केला. पतीने माझ्या खात्यावरील दीड लाख रुपये आणि दागिनेही काढून घेतले. याउपरही नव्या घरासाठी वडिलाकडून पैसे आणण्यासाठी छळ होत असल्याने पती आकाश शिवाजी आनंदे व सुनीता शिवाजी आंनंदे (रा. जुना बोरामणी नाका, सोलापूर) यांच्याविुरुद्ध तक्रार दिली आहे. जोडभावी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भा. दं. वि. ४९८ अ अन्वये गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार रुपनर करीत आहेत.