पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी पंचसूत्री कार्यक्रम विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:18 AM2021-07-17T04:18:59+5:302021-07-17T04:18:59+5:30
जागतिक कोरोना महामारीत शिक्षणाची पद्धत कोलमडली आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण ...
जागतिक कोरोना महामारीत शिक्षणाची पद्धत कोलमडली आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा अनोखा फंडा या शाळेतील शिक्षकांनी अवलंबिला. यामध्ये प्रामुख्याने १०० टक्के विद्यार्थ्यांना अँड्रॉईड मोबाईल उपलब्धतेसाठी पालकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी देत त्यांना त्यासाठी प्रवृत्त करत शिक्षणाच्या नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत.
अशी चालते पंचसुत्री
पहिला उपक्रम : वर्गात एक झाड तयार केलं. ज्याला नाव दिलं ‘आनंदाचं झाड’. दररोज मुलांनी नियमित अभ्यासासोबत सोपे चित्र या झाडावर चिकटवायचे. त्यामुळे हे झाड चित्रांच्या फुला-फळांनी बहरत आहे. दुसरा उपक्रम : माझे मित्र या सदरात घरी पाळलेले प्राणी, पक्षी यांची माहिती घेत या मित्रांसोबत सेल्फी घेत त्यांची माहिती घेतली जाते. तिसरा उपक्रम : संडे फन डेमध्ये टोमॅटो, मासा, मास्क, चिमणी असे चित्र, क्राफ्ट व्हिडिओतून शिकवत आहेत. मुलांकडून पालकांच्या मदतीने व्हिडिओ पाठवून आकर्षक कलाकृती तयार करून घेतल्या जातात. चौथा उपक्रम : झाडे माझे मित्र यामध्ये मुलांकडून घरीच झाड लावून त्या संबंधी व्हिडिओ, व्हाॅट्सॲपवरच मार्गदर्शन केले जाते. यातून त्यांना झाडांविषयी प्रेम, आपुलकी वाढवली जाते. पाचवा उपक्रम : कनेक्टिंग टुगेदर यामध्ये दररोज विविध घटकांवर आधारित व्हिडिओ पाठवून विद्यार्थ्यांच्या टेस्ट घेतल्या जातात. याद्वारे मुलेही शालेय अभ्यास व बाह्य ज्ञानावर आधारित विविध व्हिडिओ, ऑडिओ व मेसेज पाठवतात.
कोट :::::::::::::::
पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवला. यातच सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या अनुषंगाने एक वेगळा उपक्रम हाती घेतला. याला पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या कलेच्या दृष्टीने नवनवीन गोष्टींचा वापर करून त्यांना शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. प्रयोगशील पद्धतीचा वापर केल्यास याचे नक्कीच यश मिळते.
- सुप्रिया शिवगुंडे
शिक्षक, शिंदेवस्ती