७६ ग्रामपंचायतींना साडेपाच कोटींचा विकासनिधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:19+5:302021-06-21T04:16:19+5:30
दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ग्रामविकास समितीची बैठक होते. त्यात गावाचा पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर आधारित अंदाजपत्रक ...
दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ग्रामविकास समितीची बैठक होते. त्यात गावाचा पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर आधारित अंदाजपत्रक तयार केले जाते. १५ व्या वित्त आयोगात एकूण निधीपैकी ५० टक्के निधी पाणीपुरवठा, स्वच्छता तर उर्वरित ५० टक्के निधी इतर बाबींवर खर्च करण्याचे निर्देश आहेत.
तालुक्यातील अजनाळे, अकोला, चिकमहूद, एखतपूर, चोपडी, कमलापूर, घेरडी, जुनोनी, जवळा, महिम, महूद, मेडशिंगी, नाझरे, शिरभावी, सोनंद, कडलास, वाढेगाव, कोळे, वाकी-शिवणे या ग्रामपंचायतींना १० लाख रुपयांच्या पुढे निधी मिळाला आहे. तर राजापूर १ लाख ३१ हजार ३२५ तर गळवेवाडी १ लाख ५७ हजार ६४० या दोन ग्रामपंचायतींना कमी निधी मिळाला आहे.
कोट ::::::::::::::::::::
प्रत्येक गावात पाण्याचा निचरा, पाणीसाठा व्यवस्थापन, जोडरस्ते, ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते, देखभाल-दुरुस्ती, स्मशानभूमीचे बांधकाम, एलईडी पथदिवे, सौरदिव्यांचे बांधकाम व दुरुस्ती, सार्वजनिक वाचनालय, खेळाचे मैदान, वीज, पाणी, कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट अशी विकास कामे केली जाणार आहेत.
- संतोष राऊत
गटविकास अधिकारी
७६ ग्रामपंचायतींना मिळालेला निधी
अचकदाणी (५ लाख ६७ हजार ३६३), अजनाळे (१० लाख १४ हजार ४४८), अनकढाळ (४ लाख १२ हजार ५५९), अकोला (१० लाख ९ हजार ८५७), आलेगाव (८ लाख ५२ हजार ८१५), आगलावेवाडी (३ लाख ५३ हजार ७०८), बलवडी (६ लाख १४ हजार ३४६), बामणी (४ लाख ३१ हजार ५६९), बागलवाडी (३ लाख ४६ हजार ५५०), बुरंगेवाडी (३ लाख १६ हजार ९०३), बुद्धेहाळ (४ लाख ४४ हजार), भोपसेवाडी (४ लाख ८५ हजार २१५), चिंचोली (७ लाख २४ हजार ८६८), चिणके (५ लाख ९२ हजार ६९२), चिकमहूद (१२ लाख ६१ हजार २०२), चोपडी (११ लाख १६ हजार ९२९), देवळे (२ लाख ८५ हजार २९७), डिकसळ (४ लाख ३३ हजार ४६३), डोंगरगाव (६ लाख ७ हजार २६६), धायटी (७ लाख ८२ हजार ८४५), एखतपूर (११ लाख ३५ हजार ५७०), गळवेवाडी (१ लाख ५७ हजार ६४०), गायगव्हाण (२ लाख ७२ हजार ४४५), गौडवाडी (५ लाख ९५ हजार ६४८), घेरडी (२१ लाख ९ हजार १६९), हातीद (८ लाख ६२ हजार ६९२), हटकर-मंगेवाडी (३ लाख ९ हजार ८२४), हलदहिवडी (५ लाख ४० हजार ३११), हणमंतगाव (२ लाख ३४ हजार ७०९), हंगिरगे (९ लाख ३८ हजार ८५१), इटकी (२ लाख ३५ हजार), जवळा (१३ लाख ७६ हजार २८५), जुनोनी (११ लाख ४२ हजार ८८२), जुजारपूर (७ लाख ८ हजार ४२९), कमलापूर (९ लाख ५१ हजार ५३५), कडलास (१५ लाख २० हजार ३८१), कटफळ (८ लाख ३१ हजार १९८), किडेबिसरी (४ लाख ६४ हजार ५८५), कोळे (२४ लाख ९३ हजार ७५०), खवासपूर (६ लाख २० हजार २९०), खिलारवाडी (३ लाख ५५ हजार ५१३), लक्ष्मीनगर (५ लाख ४७ हजार ७५८), लोणविरे (३ लाख ३० हजार ११२), लोटेवाडी (८ लाख ५४ हजार ४४३), महिम (११ लाख ३२ हजार ९९१), मानेगाव (३ लाख १३ हजार ३३०), महूद (२६ लाख ३७ हजार ७७९), मांजरी (७ लाख ४५ हजार ९२१), मेडशिंगी (१० लाख ५१ हजार २७०), मेथवडे (४ लाख १६ हजार ४९१), नराळे (४ लाख ३१ हजार ५८८), नाझरे (११ लाख ४६ हजार ७४८), निजामपूर (२ लाख ७३ हजार ७२१), पाचेगाव बु. (८ लाख १ हजार २७३), पाचेगाव खु. (४ लाख ९१ हजार ५१८), पारे (४ लाख ९० हजार १८७), राजापूर (१ लाख ३१ हजार ३२४), राजुरी (६ लाख ११ हजार ९६९), सावे (६ लाख ६० हजार ९३८), संगेवाडी (४ लाख ३० हजार ३३२), सोनलवाडी (३ लाख ३४ हजार ३५७), सोमेवाडी (२ लाख २६ हजार ८९८), सोनंद (१२ लाख ३२६), शिरभावी (९ लाख ९ हजार ७१), शिवणे (७ लाख ५६ हजार ५२३), तिप्पेहाळी (५ लाख १२ हजार ४६४), तरंगेवाडी (४ लाख ४९ हजार ९४२), उदनवाडी (८ लाख ८७ हजार ५८८), वझरे (३ लाख २७ हजार ८९१), वाणीचिंचाळे (४ लाख ३७ हजार १७), वाकी-घेरडी (४ लाख ६६ हजार ४१६), वाकी-शिवणे (१० लाख ७८ हजार १३२), वासूद (७ लाख २४ हजार ५९), वाटंबरे (८ लाख ८२ हजार ६९५), वाढेगाव (११ लाख ९ हजार ९१८), यलमार-मंगेवाडी (७ लाख २५ हजार ८७० असा एकूण सुमारे ५ कोटी ४९ लाख २६ हजार २५८ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.