दोन मंत्र्यांच्या वादामुळे सोलापूरचा विकास खुंटला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यु. एन. बेरिया यांचा आरोप, वरून दोस्ती, आतून कुस्ती चालूच राहणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:29 AM2018-01-12T11:29:38+5:302018-01-12T11:31:39+5:30

आता मनोमीलन करू, असे दोघा मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी वरून दोस्ती, आतून कुस्ती असेच चित्र पाहावयास मिळेल, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. यु. एन. बेरिया यांनी पत्रकार परिषदेत केला. 

The development of Solapur due to the two ministers' dispute, Congress leader Yunus N. Berea accuses, friendship from above, wrestling from within will continue! | दोन मंत्र्यांच्या वादामुळे सोलापूरचा विकास खुंटला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यु. एन. बेरिया यांचा आरोप, वरून दोस्ती, आतून कुस्ती चालूच राहणार !

दोन मंत्र्यांच्या वादामुळे सोलापूरचा विकास खुंटला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यु. एन. बेरिया यांचा आरोप, वरून दोस्ती, आतून कुस्ती चालूच राहणार !

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणुकीपूर्वी भाजपने मोठ्या घोषणा केल्या. पण सत्तेवर आल्यावर लोकांची घोर निराशा केली : अ‍ॅड. बेरियादहा महिन्यात नगरसेवकांना निधी नाही, अत्यावश्यक कामे नाहीत. विकासकामाचा बोजवारा उडाला : अ‍ॅड. बेरियाआपसातील भांडण व राजकारणामुळे शहराचा विकास खुंटला


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३  : सहकारमंत्री व पालकमंत्री गटातील वादामुळे दहा महिन्यात महापालिकेत एकही विकासाचे काम झाले नाही. दहापैकी केवळ दोन सभा झाल्या. या गटबाजीची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. आता मनोमीलन करू, असे दोघा मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी वरून दोस्ती, आतून कुस्ती असेच चित्र पाहावयास मिळेल, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. यु. एन. बेरिया यांनी  पत्रकार परिषदेत केला. 
अ‍ॅड. बेरिया म्हणाले, निवडणुकीपूर्वी भाजपने मोठ्या घोषणा केल्या. पण सत्तेवर आल्यावर लोकांची घोर निराशा केली. दहा महिन्यात नगरसेवकांना निधी नाही, अत्यावश्यक कामे नाहीत. विकासकामाचा बोजवारा उडाला आहे. दोन मंत्र्यांच्या गटबाजीत साडेतीन वर्षे गेली आहेत. शहराच्या विकासासाठी त्यांनी कोणतीही महत्त्वाची योजना आणून कामास सुरुवात केलेली नाही. स्मार्ट सिटी योजनेचा फज्जा उडाला आहे. काँग्रेसची सत्ता असताना स्मार्ट सिटीसाठी निधी आला. पण आम्ही केलेले ठराव तीनवेळा विखंडित करावयास लावले. उड्डाणपूल, रस्ते या आधीच्याच योजना आहेत. स्मार्ट सिटीतून करण्यात येणारा रस्ता २०१९ ची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संथपणे करण्यात येत आहे. 
दोन्ही मंत्र्यांची तोंडे दोन दिशेला आहेत. आपसातील भांडण व राजकारणामुळे शहराचा विकास खुंटला. मुख्यमंत्र्यांना यांच्या भांडणाची दखल घ्यावी, हे सोलापूरचे दुर्दैव म्हणावे लागेल. इतके करूनही यांच्यात एकी होणार नाहीच. वरून दोस्ती, आतून कुस्ती असे यांचे राजकारण चालणारच. याउलट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी खासदार, गृहमंत्री असताना विविध योजनेतून ५६ कोटी, अनुदानातून ४० कोटी, महसूल निधीतून १५५१ कोटी, भांडवली निधीतून १२८८ कोटी अशी २९३५ कोटींची विकासकामे केली आहेत. आता भाजपची सत्ता आल्यावर स्मार्ट सिटी योजनेचा निधी येऊनही कामे मार्गी लावली जात नाहीत. काम करून घेण्यासाठी सत्ताधाºयांचा प्रशसनावरील वचक कमी असल्याचे हे द्योतक असल्याचा आरोप अ‍ॅड. बेरिया यांनी केला.
---------------------
आताच का कळवळा
- अ‍ॅड. बेरिया यांच्या आरोपाचा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी समाचार घेतला आहे. असे सर्वच पक्षात चालते. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यावर बेरियांना गटबाजीचा का कळवळा आला, असा त्यांनी सवाल केला. १३ जानेवारीनंतर पाहा महापालिकेच्या कामकाजात फरक झालेला दिसेल. 

Web Title: The development of Solapur due to the two ministers' dispute, Congress leader Yunus N. Berea accuses, friendship from above, wrestling from within will continue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.