विकासकामे, सहकारी संस्थांना मदत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:24 AM2021-09-18T04:24:32+5:302021-09-18T04:24:32+5:30

वाडीकुरोली (ता. पंढरपूर) येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ केला. याप्रसंगी आ. बबनदादा शिंदे, आ. ...

Development work, will help cooperatives | विकासकामे, सहकारी संस्थांना मदत करणार

विकासकामे, सहकारी संस्थांना मदत करणार

Next

वाडीकुरोली (ता. पंढरपूर) येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ केला. याप्रसंगी आ. बबनदादा शिंदे, आ. शहाजीबापू पाटील, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादी उद्योग-व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, अशोक घोगरे, युवा गर्जनाचे संस्थापक समाधान काळे, सरपंच अर्चना काळे, उपसरपंच अर्चना पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

निर्मलग्राम वाडीकुरोली ग्रामपंचायतीत कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे नेतृत्व सत्तेत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच चार कोटींहून अधिक रकमेच्या पिराची कुरोली-भडीशेगाव रस्ता, शेळवे-वाडीकुरोली रस्ता, वाडीकुरोली ते राज्य मार्ग १५ ला जोडणारा रस्ता, स्मशानभूमी सुशोभीकरण, दलित वस्ती सुधारणा या विकासकामांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते केला.

मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये सर्व विषय थांबवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कल्याणराव काळे यांच्या विषयाकडे विशेष लक्ष देऊन त्यावर सविस्तर चर्चा करावी, अशी आग्रही भूमिका घेतली. साखर कारखान्यासंदर्भातील अडचणी लवकरच दूर होतील. त्यासंदर्भातील विषयावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सर्व मंत्रिमंडळाने त्यास अनुमोदन दिले आहे. वाडीकुरोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी दिली. सूत्रसंचालन प्रा. समाधान काळे यांनी केले. तर ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया काळे यांनी आभार मानले.

..............

फोटो : १७वाडीकुरोली)

Web Title: Development work, will help cooperatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.