खासगी ट्रॅव्हलच्या धडकेत भाविकाचा मृत्यू
By दिपक दुपारगुडे | Updated: July 14, 2024 19:42 IST2024-07-14T19:42:44+5:302024-07-14T19:42:51+5:30
पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

खासगी ट्रॅव्हलच्या धडकेत भाविकाचा मृत्यू
सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी येणाऱ्या वारकऱ्याला एका खासगी बसने धडक दिल्याने जागीच मृत्यू झालाय. पंढरपूर-टेंभुर्णी मार्गावर रविवारी पहाटे खासगी ट्रॅव्हलने पाठीमागून धडक दिल्याने भाविकाचा मृत्यू झाला. या अपघाताची करकंब पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांनी चालकास ट्रॅव्हलसह ताब्यात घेतले आहे.
रविवार १४ जुलै रोजी पहाटे पंढरपूरकडे जाणाऱ्या के.ए. २०, ए.सी १४१४ या क्रमांकाच्या ट्रॅव्हलने पायी चालणाऱ्या बाबुराव धोंडिबा जावळे ( ६०, रा. कवठा, ता. नेवासा) या भाविकास पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत नवनाथ शिंदे (रा. कवठा) यांनी करकंब पोलिसांत फिर्याद दिली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या वारकऱ्याचा खासगी बसने धडकेत मृत्यू झालाय. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.