पोलीसदादा भाविक, रुग्णांची अडवणूक थांबवा अन्‌ दिलासा द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:18 AM2021-04-03T04:18:50+5:302021-04-03T04:18:50+5:30

वाहतूक शाखेचे पोलीस शहरापासून लांब एक ते दोन किलोमीटर अंतरावर तेही रोज एका मार्गावर थांबतात. राज्यातून स्वामी समर्थ महाराजांच्या ...

Devotees, stop obstruction of patients and give relief! | पोलीसदादा भाविक, रुग्णांची अडवणूक थांबवा अन्‌ दिलासा द्या!

पोलीसदादा भाविक, रुग्णांची अडवणूक थांबवा अन्‌ दिलासा द्या!

Next

वाहतूक शाखेचे पोलीस शहरापासून लांब एक ते दोन किलोमीटर अंतरावर तेही रोज एका मार्गावर थांबतात. राज्यातून स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे वाहन थांबवून तपासणी करतात. तपासणी करण्यास काहीच हरकत नाही. पण सर्व कागदपत्रे सोबत असतानाही विनाकारण त्याच ठिकाणी थांबवून ठेवतात. यामुळे आमचा वेळ वाया जातोच, शिवाय पुढील नियोनजही कोलमडते. याचा आम्हाला त्रास होतो, असे पुणे येथील बालाजी चव्हाण या भाविकाने सांगितले.

हे वाहतूक पोलीस कधी गाणगापूर रोडवर तर कधी हैद्रा रोडवर, तर कधी वागदरी, नागणसूर, तोळणूर, सोलापूर, उडगी, सलगर, जेऊर, तडवळ, चप्पळगाव अशा वेगवेगळ्या मार्गावर थांबतात. यापैकी हैद्रा, गाणगापूर, सोलापूर मार्गावर सतत भाविकांची वर्दळ असते. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या भाविकांना त्रास होतो, असे चौधरी यांनी सांगितले.

वनस्पती औषधांसाठी रुग्णांची ये-जा

अक्कलकोट तालुक्यातील भोसगे, साफळे, मदगुणकी, इब्राहिमपूर या गावात प्रत्येक बुधवारी व रविवारी असे आठवड्यातून दोन दिवस लकवा व कावीळ झालेल्या रुग्णांना वनस्पती औषध दिले जाते. यासाठी दूरवरून रुग्ण व त्यांचे नातेवाईक खासगी वाहन करून येतात. त्यांचे वाहनही अडविले जाते, असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

कोट ::::::::

काही दिवसांपूर्वी मला लकवा मारला होता. त्यामुळे इब्राहिमपूर येथे उपचारासाठी टमटम भाड्याने करून जात होतो. तेव्हा अक्कलकोट एमएसईबी कार्यालयाजवळ वाहतूक पोलिसांनी अडवले. त्यांना सत्य परिस्थिती सांगितली. शिवाय वाहकाकडे सर्व कागदपत्रेसुद्धा होती, तरीही आमचे काहीही न ऐकता पुढे जाण्यास मज्जाव केला. यात्रा आम्हाला त्रास झाला.

- मल्लिनाथ मेटगे, रुग्ण

कोट :::::::

वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी. विनाकारण भाविक किंवा रुग्णांना त्रास देणे चुकीचे आहे. असे कोण करीत असेल तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल.

- सूर्यकांत कोकणे,

जिल्हा वाहतूक विभाग प्रमुख

Web Title: Devotees, stop obstruction of patients and give relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.