सोलापुरात हातभट्ट्यांवर धाडसत्र; तिऱ्हे, गुळवंची, वांगीमधील तीन लाखांची दारू जप्त

By Appasaheb.patil | Published: August 18, 2023 06:23 PM2023-08-18T18:23:15+5:302023-08-18T18:23:48+5:30

 राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात हातभट्टी दारु विरोधात नोंदविलेल्या ९ गुन्ह्यात ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Dhadashtra on Hatbhattas in Solapur Liquor worth three lakhs seized from Tirhe, Gulvanchi, Vangi | सोलापुरात हातभट्ट्यांवर धाडसत्र; तिऱ्हे, गुळवंची, वांगीमधील तीन लाखांची दारू जप्त

सोलापुरात हातभट्ट्यांवर धाडसत्र; तिऱ्हे, गुळवंची, वांगीमधील तीन लाखांची दारू जप्त

googlenewsNext

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात हातभट्टी दारु विरोधात नोंदविलेल्या ९ गुन्ह्यात ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही गुळवंची तांडा, ति-हे तांडा व वांगी नंबर १ येथील तांड्यावर कारवाई केली. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या पथकांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे तांडा व गुळवंची तांड्यातील हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात सुनिता सिद्राम चव्हाण (वय ४५) या महिलेच्या ताब्यातून चार हजार तिनशे किंमतीची ८० लिटर हातभट्टी दारु जप्त करुन गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग व तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचा-यांनी पार पाडली. गुळवंची तांडा (ता. उत्तर सोलापूर) परिसरात हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर छापे टाकून सहा गुन्हे नोंदविले. 

गुळवंची तांडा येथून अनिता होमा चव्हाण व राजू ज्ञानदेव चव्हाण यांना अटक करण्यात आली. गुळवंची तांडा ते खेड रोडवर सापळा रचून हातभट्टी दारु वाहतुकीचा गुन्हा नोंद केला. या कारवाईत हातभट्टी दारू जप्त केली आहे. ही कारवाई निरिक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, अक्षय भरते, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, रोहिणी गुरव, कृष्णा सुळे, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, अलीम शेख, जवान अनिल पांढरे, वसंत राठोड, प्रशांत इंगोले, अण्णा कर्चे, आनंदराव दशवंत, चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे, योगीराज तोग्गी व वाहनचालक रशिद शेख यांनी पार पाडली.

एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक विनायक जगताप यांनी जवान विकास वडमिले यांच्यासह करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून गणेश सहदेव जाधव (वय ३२) च्या ताब्यातून १७०० लिटर रसायन, लोखंडी बॅरेल, चाटू टोपली इ. साहित्य असा एक्केचाळीस हजार पाचशे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दुय्यम निरिक्षक पंढरपूर मयुरा खेत्री यांनी जवान प्रकाश सावंत सह पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावाच्या हद्दीतील हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून २५० लिटर रसायन जागीच नाश केले.

Web Title: Dhadashtra on Hatbhattas in Solapur Liquor worth three lakhs seized from Tirhe, Gulvanchi, Vangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.