धाराशिव साखर कारखाना उभारणार राज्यात पहिला ऑक्सिजननिर्मिती पायलट प्रोजेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:22 AM2021-04-25T04:22:19+5:302021-04-25T04:22:19+5:30
माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिट्यूटने २३ एप्रिल रोजी झूम मीटिंगद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मीटिंग ...
माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिट्यूटने २३ एप्रिल रोजी झूम मीटिंगद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मीटिंग घेण्यात आली. त्यामध्ये धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील सहभागी झाले होते. राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजननिर्मितीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प धाराशिव साखर कारखान्यावर वसंतदादा इन्स्टिट्यूट झूम मीटिंगमध्ये करण्याचे निश्चित झाले.
या बैठकीदरम्यान व्हीएसआयकडून तातडीच्या उपाययोजना सांगण्यात आल्या. कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहेत. अशा प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत ‘माॅलेक्युलर सिव्ह’ वापरून हवेतील वायूद्वारे ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्याचा तपशील चेअरमन अभिजित पाटील यांनी पटवून सांगितला.
धाराशिव साखर कारखाना प्रतिदिन १६ ते २० टन ऑक्सिजननिर्मिती करणार आहे. वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सिजननिर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यरत करीत आहेत. धाराशिव साखर कारखान्यास ऑक्सिजननिर्मिती तयारीस लागणाऱ्या परवानगी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्वरित देण्याचे सांगून लवकर पायलट प्रकल्प कार्यरत करावा, असे सांगितले. वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरिंग टेक्निकलच्या माध्यमातून ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.