सोलापूर महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर फेकले डिझेल आणि आॅईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:25 PM2018-11-05T13:25:20+5:302018-11-05T13:27:04+5:30
पोलिसांनी त्यांची संबंधित अधिकाºयांची भेट घालून देण्याची तयारी केली होती.
सोलापूर : अपंगांचा निधी वेळेवर खर्च न केल्याच्या निषेध म्हणून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर डिझेल आणि आॅईल फेकले.
याप्रकरणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष जमील शेख यांच्यासह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे, अजित कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांनी महापालिकेत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
पोलिसांनी त्यांची संबंधित अधिकाºयांची भेट घालून देण्याची तयारी केली होती. परंतु, कार्यकर्त्यानी घोषणाबाजी करीत प्लास्टिक पिशवीत भरुन आणलेले डिझेल आणि आॅईल आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वासमोर फेकले. बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस काही वेळ बघ्याच्या भूमिकेत होते.