डिझेल निघाले काळ्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:38+5:302021-09-13T04:21:38+5:30

पोलिसांनी टँकर लावला ठाण्यात लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : वाहतूक परवाना नसताना काळ्या बाजारात डिझेल घेऊन निघालेला टँकर ...

Diesel goes on the black market | डिझेल निघाले काळ्या बाजारात

डिझेल निघाले काळ्या बाजारात

Next

पोलिसांनी टँकर लावला ठाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

बार्शी : वाहतूक परवाना नसताना काळ्या बाजारात डिझेल घेऊन निघालेला टँकर बार्शी पोलिसांनी सापळा रचून पकडला. या टँकरमधून ९ हजार लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. तसेच १८ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून चालकासह पाच जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई शनिवारी रात्रीच्या दरम्यान झाली. याबाबत पोलीस नाईक लक्ष्मण भांगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चालक प्रदीप समर बहाद्दूर यादव (वय २८, रा. नालासोपारा, इस्ट पालघर), पवन तिवारी (रा. ३७, रा. नालासोपारा, मुंबई), विठ्ठल पठारे (वाकड पुणे), मनोज होनमाणे (माळीनगर, अकलूज), सीताराम भरणे यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलीस सूत्रांकडील माहितीनुसार, गणेशोत्सव सुरू असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार शहरात फिर्यादी लक्ष्मण भोंग व त्याचे सहकारी पोलिस अरुण माळी हे गस्त घालीत होते. कुर्डुवाडी रस्त्याच्या दिशेने शहरात येताना चालकाने नो एंट्रीत प्रवेश करताच पोलीसानी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. हा टँकर (एम.एच.०४: के.एफ.१८३१) हिंदुस्थान बेकरीजवल अडविला. त्याबाबत चालकास विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना या टँकरमधून ९ हजार लिटर डिझेल निदर्शनास आले. ते मुंबई येथील मेहर पेट्रोकेमिकल येथून ९ हजार डिझेल भरले. ते विठ्ठल पठारे (वाकड, पुणे) यांनी भरून दिले. ते लातूरमधील काळ्या बाजारात विक्री करणयास जात असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत कोणतीही कागदपत्रे चालकाकडे आढळली नाहीत. पोलीसांनी डिझेलसह टँकर असा १८ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

----

पुरवठा अधिका-याकडून पंचनामा

तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी काेरके यांना पंचनाम्यासाठी पोलिसांनी पाचारण करण्यात आले. ते पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या उपस्थित पंचनामा करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करत आहेत.

-----

आरोपींना चार दिवसांची कोठडी

या कारवाईत प्रदीप यादव व पवन तिवारी या दाेघांना अटक करण्यात आली आहे, त्यांना न्यायालयात उभे करताच चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

---

फोटो : १२ बार्शी टँकर

काळ्या बाजारात डिझेल घेऊन निघालेला टँकर बार्शी पोलिसांनी पकडून पोलीस ठाण्याच्या आवारात लावला.

Web Title: Diesel goes on the black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.