सोलापुरात पाण्यासाठी ५०० फुटांपर्यंत खोदाई; बोअरवेल्सच्या संख्येमुळे भेंगाळते भूई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 12:24 PM2021-07-14T12:24:31+5:302021-07-14T12:24:38+5:30

कोणाची नाही नियंत्रण?,शहराची भूजल पातळी घटली

Digging up to 500 feet for water in Solapur; The number of borewells makes the ground muddy | सोलापुरात पाण्यासाठी ५०० फुटांपर्यंत खोदाई; बोअरवेल्सच्या संख्येमुळे भेंगाळते भूई

सोलापुरात पाण्यासाठी ५०० फुटांपर्यंत खोदाई; बोअरवेल्सच्या संख्येमुळे भेंगाळते भूई

googlenewsNext

सोलापूर : सोलापूर शहर परिसरातील भूजल पातळी प्रचंड प्रमाणात घसरली असून बोअरवेलकरिता खोदाई करताना तब्बल चारशे ते पाचशे फुटापर्यंत भूगर्भात जावे लागत आहे. सोलापूर शहरात जलपुनर्भरणाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे भविष्यात ८०० ते हजार फुटापर्यंत जाण्याची वेळ सोलापूरकरांवर येणार आहे.

पिण्याच्या पाण्याकरिता उजनी धरणावर सोलापूर अवलंबून आहे. कधी पाच ते सहा तर कधी आठ दिवस सोलापूर शहराला पाणीपुरवठा होतोय. हद्दवाढ भागात अद्याप काही ठिकाणी पिण्याचे पाईपलाईन नाहीत. अशा भागात बोअरवेलच्या पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत. शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे बहुतांश शहरी भागातील नागरिक बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असतात. उद्योग क्षेत्रात बोअरवेलच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल्स आहेत. जुळे सोलापूर सारख्या भागात तब्बल तीनशे ते साडेतीनशे फुटापर्यंत पाणी लागतच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बोअरवेल्स निरुपयोगी ठरल्या आहेत.

 

  • शहराला होणारा पाणीपुरवठा- ५-६ दिवसाआड
  • शहरातील एकूण बोअरवेल्स-२५००
  • शहराची एकूण लोकसंख्या-१२ लाख

........

प्रति माणसी पाण्याची गरज-१०५-११० लिटर प्रतिदिन

कोणत्या भागात किती फुटापर्यंत पाणी लागते

  • जुळे सोलापूर-२००-२५०
  • रेल्वे लाईन-२७५-३२५
  • मजरेवाडी-१०० -२००
  • अशोक चौक-२५०-३००
  • नीलम नगर-२००-३००
  • नवी पेठ-२५०-३००
  • साखर पेठ-१००-१५०
  • भवानी पेठ-१००-२००
  • सुनील नगर-२००-२५०
  • एमआयडीसी एरिया-२००-३००

 

परवानगी कोणीच घेत नाही

बोअरवेल्स मारताना शासकीय नियमांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांचे आहे. या संबंधित आतापर्यंत प्रशासकीय पातळीवर जनजागृती नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष नसते. त्यामुळे खासगी बोअरवेल्सवाले बिनधास्त पाचशे ते सहाशे फुटापर्यंत पाणी उपसा करतात. भूजल पातळी कमी होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

 

सार्वजनिक बोअरवेल्स मारताना महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सार्वजनिक बोअर मारताना संबंधित ठेकेदार महानगरपालिकेची परवानगी घेतात. पण खासगी जागेत बोअरवेल्स मारताना कोणीच परवानगी घेत नाहीत. भूजल पातळी कमी होत असल्यामुळे कमीत कमी शंभर तर जास्तीत जास्त सहाशे-सातशे फुटापर्यंत पाणी उपसा होतोय. इलेक्ट्रॉनिक पंपाचाही मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे भूजल पातळीत घट होत आहे.

- व्यंकटेश चौबे, सहायक अभियंता

पाणीपुरवठा विभाग, महानगरपालिका सोलापूर

Web Title: Digging up to 500 feet for water in Solapur; The number of borewells makes the ground muddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.