डिजिटल टॅबमुळे शैक्षणिक वाटचाल झाली सोईस्कर : धनंजय देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:19+5:302020-12-31T04:22:19+5:30
कोरोनाच्या परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्रातील गरज ओळखून रोटरी क्लब, अकलूज आणि रोटरी क्लब पुणे नॉर्थ यांच्यातर्फे माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील ...
कोरोनाच्या परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्रातील गरज ओळखून रोटरी क्लब, अकलूज आणि रोटरी क्लब पुणे नॉर्थ यांच्यातर्फे माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक डिजिटल टॅब उपलब्ध करून दिले. तालुक्यातील १५ झेडपी शाळेत २५० शैक्षणिक डिजिटल टॅबचे वितरण केले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी कुमार शिंगारे यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना टॅब ऑपरेटिंग करण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे नॉर्थच्या कविता शिंगारे, मनीषा कोनकर, मोहन पुजारी, केतन जोशी, रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष डॉ. बाहुबली दोशी, सचिव ओजस दोभाडा, स्वप्निल शहा, दीपक फडे, गजानन जवंजाळ, योगेश व्होरा, नवनाथ नागणे, केतन बोरावके, आशिष गांधी, गोमटेश दोशी, पीयूष व्होरा, अमेय व्होरा, नितीन कुदळे, नितीन दोशी उपस्थित होते. सुशील व्होरा यांनी प्रास्ताविक केले. हनुमंत सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. ओजस दोभाडा यांनी आभार मानले.