खर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात डिजिटल एक्स-रे मशीन कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:15 AM2021-07-12T04:15:18+5:302021-07-12T04:15:18+5:30
कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून क्लाऊड बेस्ट डिजिटल मशीन खर्डी (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बसवण्यात आले आहे. ...
कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून क्लाऊड बेस्ट डिजिटल मशीन खर्डी (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बसवण्यात आले आहे. दररोज जास्त ओपीडी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाचवेळी २३ टेस्ट होणारी ही मशीन आहे. या मशीनचे उद्घाटन आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. प्रशांत परिचारक यांनी खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीसाठी १० लाख रूपयांचा निधी आमदार फंडातून देण्याची घोषणा केली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील रुग्णांच्या नियमित तपासणीबरोबर गरोदर, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुली-मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. लसीकरण, बाळंतपण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही पार पाडल्या जातात. दरम्यान रक्तातील शर्करा, हिमोग्लोबिन तपासणी महत्त्वाची असते. यासाठी ही मशीन महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळी पं. स. सभापती अर्चना व्हरगर, उपसभापती राजश्री भोसले, वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय साळुंखे, माजी उपसरपंच प्रणव परिचारक, सरपंच मनिषा सव्वाशे, उपसरपंच शरद रोंगे, रमेश हाके, पं. स. सदस्य दादा मोटे, सुरेश आगावणे, नारायण रोंगे, मोहन रोंगे, आरोग्य सेवक, सहाय्यक, नर्स, डॉक्टर स्टाफ यांच्यासह सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
याची होणार तपासणी
क्लाऊड बेस्ट डिजिटल मशीनसमोरील स्टॅन्डवर उभारल्यास महिलेची उंची, वजन क्षणात कळते. त्याचबरोबर शक्ती, रक्तातील ऑक्सिजन, छातीचे ठोके, रक्तदाब, इन्फ्रारेड, तापमापक, ब्लड प्रेशर, बाॅडिमास, चरबी कॅलरीज, कॅल्शियम, ई १५, बीएमडब्लू अशा २३ पॅरामीटरच्या तपासण्या दहा मिनिटात केल्या जातात. या तपासण्यांचे रेकॉर्ड रूग्णांच्या नावे संगणकावर नोंद होते.