दिलीप माने सह अन्य संचालकांचे अर्ज सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांकडून वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:24 PM2018-06-16T18:24:37+5:302018-06-16T18:24:37+5:30
सोलापूर : निवडणुकीच्या रिंगणात उतरण्या अगोदर कुरघोडी व न्याय मंदीरात गाजत असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सभापती दिलीप माने यांचयासह सर्व संचालकांचे अर्ज जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी वैध ठरवले़
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांच्यासह इंदुमती अलगोंडा-पाटील, अविनाश मार्तंडे, अशोक देवकते, सिध्दाराम चाकोते या संचालकांचे अर्ज बाजार समिती थकबाकीदार असल्याने निवडणुक निर्णय अधिकारी यांनी छाननीत नामंजूर केले होते़ या विरोधात या सर्वांनी जिल्हाधिकारी भोसले याच्याकडे अपील दाखल केले होते़ याप्रकरणी १४ जुन रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजुनी युक्तीवाद केला़
एक सदस्यीय प्रधिकरणाचा आदेश अमान्य असल्याबाबत उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले असून सदर आदेशास स्थगिती दिलेली असून अपिलार्थी यांचे नॉमेनेशन पत्रासंदर्भात केलेली कार्यवाही ही बाजार समितीच्या निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचे हेतूनी केली असल्याचे मत उच्च न्यायालयाने आदेशात नोंदवली आहे़ तसेच ६ जुन २०१८ रोजीचा आदेश अपिलीय अधिकारी यांनी विचारात घेण्या संदर्भात निर्देश दिलेले होते़
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून दिलीप माने यांच्यासह इंदुमती अलगोंडा-पाटील, अविनाश मार्तंडे, सिध्दाराम चाकोते, अशोक देवकते या विद्यमान संचालकांचे अर्ज मंजूर झाले़ अपिलार्थी दिलीप माने व इतर यांच्यावतीने अॅड़ इंद्रजित पाटील, अॅड़ वैभव देशमुख यांनी काम पाहिले़