सकल मराठा समाजाचा मोर्चा; आता पुण्यात बैठक, बांधव कारने रवाना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:49 PM2020-11-07T12:49:29+5:302020-11-07T13:02:27+5:30

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समाज बांधव आक्रमक; पुणे येथे मुख्य सचिवांसह होणार बैठक

Dindi Morcha became the foothold of the entire Maratha community; Officials left in ten vehicles | सकल मराठा समाजाचा मोर्चा; आता पुण्यात बैठक, बांधव कारने रवाना !

सकल मराठा समाजाचा मोर्चा; आता पुण्यात बैठक, बांधव कारने रवाना !

googlenewsNext

पंढरपूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी ते पंढरपूर शहर पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर दहा गाड्यांमध्ये मराठा बांधव बसून पुण्यामध्ये जाणार आहेत. त्याठिकाणी मुख्य सचिवांसह मराठा बांधवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे पदाधिकाऱ्याने सांगितले.


सध्या कोरोनाची या संसर्गजन्य रोगाच्या संकटाचे सावट हटली नाही. यामुळे पंढरपुरात गर्दी होऊ नये. नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडू नये. यासाठी मराठा समाजाचा मोर्चा गर्दी करु नये अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच अधिकची सुरक्षा म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता. सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा समाजाचे पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात केली होती. साडे अकराच्या सुमारास मराठा बांधवांना शासनाचा आदेश जुगारून नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मोर्चास सुरवात केली.

तसेच श्री विठ्ठल मंदिर ते पंढरपूर शहर पोलीस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यापासून मराठा समाज बांधवांनी त्यांच्या त्यांच्या वाहनामध्ये मुंबईकडे जाण्यास सुरुवात केली. या वाहनांसह पोलिस प्रशासनाने पोलीस बंदोबस्तही रवाना केला आहे.

Web Title: Dindi Morcha became the foothold of the entire Maratha community; Officials left in ten vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.