माघ वारीपूर्वीच दिंड्या पंढपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:23 AM2021-02-16T04:23:25+5:302021-02-16T04:23:25+5:30

कोरोनाच्या संकटामुळे प्राथमिक स्वरूपात केल्या आहेत, त्याच पद्धतीने २३ फेब्रुवारी रोजी होणारा माघ एकादशी यात्रेचा सोहळादेखील मोजक्याच लोकांच्या ...

Dindya Pandhpur before Magh Wari | माघ वारीपूर्वीच दिंड्या पंढपुरात दाखल

माघ वारीपूर्वीच दिंड्या पंढपुरात दाखल

Next

कोरोनाच्या संकटामुळे प्राथमिक स्वरूपात केल्या आहेत, त्याच पद्धतीने २३ फेब्रुवारी रोजी होणारा माघ एकादशी यात्रेचा सोहळादेखील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. हे ओळखून माघ यात्रेपूर्वीच छोट्याछोट्या दिंड्या पंढरीत येऊन विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा मारून आपली वारी पूर्ण करीत असल्याचे दिसून आले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. भाविकांसह स्थानिक नागरिकांना धोका होऊ शकतो. यामुळे शासन आदेशाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने १८ मार्च २०२० पासून विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद केले. मात्र, विठ्ठल-रुक्मिणीचे रोजचे नित्योपचार सुरू होते. यापूर्वी आषाढी अन् कार्तिक हे दोन मोठे सोहळे मर्यादित स्वरूपात साजरे केले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, पुन्हा कोरोना वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून माघ यात्रादेखील प्राथमिक स्वरूपात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही बाब लक्षात घेऊन सोलापूरसह कर्नाटकतील छोट्याछोट्या दिंड्या पंढरीत येऊन आपली माघी वारीची परंपरा पूर्ण करत आहेत. यामुळे मागील चार दिवसांपासून विठ्ठल मंदिर परिसरात गर्दी होत आहे. त्याचबरोबर चंद्रभागा नदीपात्रात स्नान करण्यासाठीदेखील भाविकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. बेळगावच्या दिंडीची झाली माघी यात्रामागील अनेक वर्षांपासून बेळगाव येथे विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ माघी यात्रेसाठी पंढरपुरात येते. यंदा कोरोनामुळे माघी यात्रादेखील रद्द होऊ शकते. यामुळे माघी एकादशी सोहळ्यापूर्वीच १३ फेब्रुवारीला २१ भाविकांची दिंडी पंढरपुरात आली. शहरातील बिर्ला धर्मशाळा येथे मुक्कामी होती. १५ फेब्रुवारी रोजी ते विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा मारून गावी परत निघाल्याचे परेशराम मल्लापा लाड यांनी सांगितले.

फोटो :

१५पंढरपूर माघ वारी

ओळी

माघ यात्रेपूर्वी दिंडी पंढरीत येऊन यात्रा पूर्ण करत आहेत.

Web Title: Dindya Pandhpur before Magh Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.