रात्री ढाब्यावर जेवण अन् सकाळी सापडले प्रेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:14 PM2019-07-03T15:14:24+5:302019-07-03T15:16:19+5:30

जलसंपदा खात्यामधील क्लार्क चा शिंगोली गावाच्या शिवारात खून

Dinner in the dump and dawn found in the morning | रात्री ढाब्यावर जेवण अन् सकाळी सापडले प्रेत

रात्री ढाब्यावर जेवण अन् सकाळी सापडले प्रेत

Next
ठळक मुद्देसोलापूर-मंगळवेढा रोडवरील तरटगाव शिवारामध्ये कुरुलच्या अण्णासाहेब सुरेश घोडके (वय ३५) यांचे प्रेत सापडल्याने या परिसरात एकच खळबळघटनेची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी पोहोचले

कुरुल: अज्ञात इसमाने काम आहे म्हणून पतीला बोलावून नेले अन् सकाळी त्याचे प्रेत सापडल्याची फिर्याद मयताच्या पत्नीने मंगळवारी कामती पोलीस ठाण्यात दिली आहे. सोलापूर-मंगळवेढा रोडवरील तरटगाव शिवारामध्ये कुरुलच्या अण्णासाहेब सुरेश घोडके (वय ३५) यांचे प्रेत सापडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मयत अण्णासाहेब घोडके यांची पत्नी अनिता हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती जलसंपदा खात्यामध्ये क्लार्क  म्हणून कामास आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची पुणे येथे बदली झाली होती मात्र ते कामावर जात नव्हते. सोमवारी (१ जून) संध्याकाळी एका अज्ञात इसमाने काम आहे म्हणून त्यांना बाहेर घेऊन गेले. रात्री उशिरापर्यंतही परत आले नाहीत. मंगळवारी सकाळी सोलापूर-मंगळवेढा शिवारात माने यांच्या शेतामध्ये मयत अवस्थेमध्ये आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता अज्ञात कारणावरून अण्णासाहेब घोडके यांच्या डोक्यात मोठा दगड घालून गंभीर जखमी केले आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत रस्त्यावर टाकून दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भा. दं. वि. ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास सपोनि उंदरे करीत आहेत.

रात्री मावसभावासोबत पार्टी
- घरातून बाहेर पडल्यानंतर रात्री ९ वाजता अण्णासाहेब यांचा चुलतभाऊ रितेश याला फोन आला होता. यावेळी त्याने ‘मावस भावासोबत कामती (खु.) च्या नवीन समाधान धाबा येथे पार्टी चालू आहे. तू जेवायला ये’ असे सांगितले होते. त्यानंतर त्याचा संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती चुलतभाऊ रितेश याच्या सांगण्यावरुन हाती आली आहे. मयत घोडके यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Web Title: Dinner in the dump and dawn found in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.