जेवणाची पार्टी गावाला भोवली; बोकड खाणाºया ४० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:24 AM2020-07-24T11:24:57+5:302020-07-24T11:26:57+5:30
पंढरपूर तालुक्यातील घटना; जेलमधील त्या कैद्याला पार्टीस नेणाºया त्या दोन पोलिसांनाही केले निलंबित
मंगळवेढा : कोरोनाच्या आपत्तीच्या काळात गावात गर्दी जमवून आदेशाचे उल्लंघन करून साथीचे रोगाचा फैलाव होईल याची कल्पना असतानाही जाणीवपुर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रकरणी तो कैदी, दोन निलंबित पोलिस व पार्टीच्या आयोजकासह आंबे (ता पंढरपूर) येथील जेवण पार्टीस हजर असणाºया ३० ते ४० जणांवर पंढरपूरपोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, १७ जुलै रोजी मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवर असणा?्या आंबे गावात शिवाजी बळीराम भोसले ( रा आंबे) यांनी जेवणाची पार्टी आयोजित केली होती सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग असताना शासकीय आदेशाचे उल्लंघन करून साथीच्या रोगाचा फैलाव होईल याची कल्पना असताना सुद्धा जाणीवपूर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यत सुरू होता या पार्टीस गावातील ३० ते ४० नागरिक उपस्थित होतें त्याचबरोबर सबजेलमध्ये अटकेत असलेला तानाजी बळीराम भोसले यास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे जेलमधील ड्युटी वरील कर्मचारी बजरंग माने व उदय ढोणे यांनी पार्टीस आणले त्यामुळे. भा.द.वी कलम १८८,२६९, २७० सह आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कलम ५१(ब) , भारतीय साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम ३(१) (अ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे त्या कैद्यासह दोन निलंबित पोलीस व पाटीर्चे आयोजन करणा?्या शिवाजी बळीराम भोसले याच्यावर पंढरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद आंबे गावचे तलाठी प्रकाश तानाजी गुजले यांनी दिली त्यानुसार पुढील तपास पंढरपूर पोलीस करीत आहेत.
कैदी पलायन प्रकरणी ही दोषी पोलिसांवर कारवाई अटऴ़़
चार दिवसांपूर्वी सब जेल मधून तीन कैदी पलायन प्रकरणी ही कर्तव्यात कसूर करणा?्या पोलिसांवरही कारवाई होणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली पलायन झाले त्या दिवशी चार पोलीस कर्मचारी याची ड्युटी होती याची चौकशी सुरू आहे़ येत्या दोन दिवसात या प्रकरणी दोषींवर कारवाई होईल कर्तव्यात कसूर करणाºया व पोलीस खात्याला न शोभणारे कृत करणाºयाची गय केली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले़ वारंवार कैदी पलायन प्रकरणी जेलच्या सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितल़े़ मंगळवेढा तालुक्यात गुरुवारी ५ कैदी कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून एकूण ३३ कैदी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत, उर्वरित ७ कैद्यांचीही सुरक्षतेच्या दृष्टीने पुन्हा कोरोना तपासणी घेतली जाईल़ जिल्ह्यात ३२ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्या संपर्कातील शंभरहून कर्मचारी विलगीकरण झाले आह़े़ पोलिसांचे संख्याबळ कमी असताना त्यात संसर्गाने काम करणे मोठे आव्हान निर्माण झाले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले़ तरीही जिल्ह्यात पोलीस दल जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितल़े. याप्रकरणी मटका, दारू, वाळू तस्करी बाबत मला गुप्तरित्या माहिती द्यावी त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ठणकावून सांगितले
आंबे गावातील जेवणाच्या पार्टी प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे़ कोरोनाच्या आपत्ती काळात शासकीय आदेशाचे उल्लंघन करून साथीच्या रोगाचा फैलाव होईल याची कल्पना असताना सुद्धा जाणीवपूर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम आयोजित करणाºया पार्टी संयोजकासह दोन निलंबित पोलीस व जेवण पार्टीस हजर असणाºया ३० ते ४० जणांवर पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े़ पोलिस खात्यास न शोभणारे कृत्य करून कर्तव्यात कसूर करणाºयांची गय केली जाणार नाही
- अतुल झेंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण)