बाजार समितीच्या संचालक अपात्रतेचे अपील फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:14+5:302021-06-02T04:18:14+5:30
आ. जयवंतराव जगताप यांनी म्हटले आहे, की बाजार समितीचे जे प्लॉट आहेत, त्यातील कोणताही प्लॉट माझ्या व्यक्तिगत नावावर नाही. ...
आ. जयवंतराव जगताप यांनी म्हटले आहे, की बाजार समितीचे जे प्लॉट आहेत, त्यातील कोणताही प्लॉट माझ्या व्यक्तिगत नावावर नाही. मुलांच्या नावे जे प्लॉट आहेत ते शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेले असून, त्यांचे तेथे स्वत:चे व्यवसाय आहेत. नियमानुसार मी स्वत: कोणताही प्लॉट घेतलेला नसल्यामुळे हा नियम मला लागू होत नाही. तसेच जगताप यांचे वकील कमलाकर वीर यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय दाखल करून त्यात वडील किंवा मुलगा, पती किंवा पत्नी अशा कुटुंबांतील इतर व्यक्तींच्या नावे व्यावसायिक प्लॉट असेल, म्हणून कुटुंबकर्त्यास अपात्र ठरविता येणार नाही, असा युक्तिवाद केला. यानुसार जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी प्रतापराव जगताप यांचे अपील फेटाळले आहे. प्रतापराव जगताप यांच्यातर्फे ॲड. उमेश मराठे यांनी काम पाहिले.
---