सोलापूरातील महावितरणच्या अधिकाºयाचे बंद घर फोडून १६ तोळे सोने लंपास, शहर पोलीसांचा तपास सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 10:52 AM2017-12-09T10:52:05+5:302017-12-09T10:56:03+5:30

शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या यश नगरातील महावितरणचे अभियंता युवराज उत्तम मोरे यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १६ तोळे सोन्यासह १० हजार रूपयाचा ऐवज लंपास केला़

Disbursement of MSEDCL officials in Solapur, 16 Tola gold lamps, city police investigation started! | सोलापूरातील महावितरणच्या अधिकाºयाचे बंद घर फोडून १६ तोळे सोने लंपास, शहर पोलीसांचा तपास सुरू !

सोलापूरातील महावितरणच्या अधिकाºयाचे बंद घर फोडून १६ तोळे सोने लंपास, शहर पोलीसांचा तपास सुरू !

Next
ठळक मुद्देशहर पोलीसांनी डॉग स्कॉडव्दारेही पाहणी केली़संजय जगताप यांच्यासह त्यांच्या पथकांनी घटनास्थळाला भेट मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला़


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या यश नगरातील महावितरणचे अभियंता युवराज उत्तम मोरे यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १६ तोळे सोन्यासह १० हजार रूपयाचा ऐवज लंपास केला़ ही घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली़ या घटनेनंतर फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, यश नगरात राहणारे महावितरणचे अभियंता युवराज उत्तम मोरे (वय ३३ रा़ यश नगर, सोलापूर) हे वडिलांचे मासिक असल्याने कुटुंंबियांसह मोहोळला गेले होते़ मुख्य गेटला कुलूप नव्हते़ थेट मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ यावेळी घरात असलेल्या कपाटातील सोन्याचांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केला़ यात ४ तोळ्यांचे लॉकेट, ४ तोळे राणी हार, ३ तोळे मोठे गंठन, २ तोळे छोटे गंठन, ३ तोळे अंगठी व रोख १० हजार रूपये लंपास केला़ घरासमोर पडलेले अस्थवस्थ साहित्य, गेटची केलेली मोडतोड व उघडा असलेला दरवाजा हे पाहुन शेजाºयांनी युवराज मोरे यांना तुमच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली़ सुमारास लक्षात आली़ या घटनेनंतर मोरे यांनी तात्काळ पोलीसांनी माहिती दिली़ या माहितीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्यासह त्यांच्या पथकांनी घटनास्थळाला भेट दिली़ यावेळी शहर पोलीसांनी डॉग स्कॉडव्दारेही पाहणी केली़ मात्र चोरट्यांचा अद्याप सुगावा लागला नाही़ या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़ 

Web Title: Disbursement of MSEDCL officials in Solapur, 16 Tola gold lamps, city police investigation started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.