पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी दुभाजकात लावलेली झाडे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:12 PM2019-06-05T14:12:49+5:302019-06-05T14:15:41+5:30
सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे चौकशीच्या मागणीसाठी आयुक्तांना दिले निवेदन
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यात सोलापूर दौºयावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी डफरीन चौक ते सेंट जोसेफ प्रशाला यादरम्यानच्या रस्ता दुभाजकात लावलेली झाडे गायब झाली आहेत. या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी केली.
शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका आयुक्त दीपक तावरे यांना निवेदन देण्यात आले. मोदींच्या स्वागतासाठी शहरात एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. अनेक दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली होती.
डफरीन चौक ते सेंट जोसेफ प्रशाला यादरम्यान लावलेली झाडे गायब झाली आहेत. ही झाडे लावण्याचा मक्ता कोणाला दिला होता, ही झाडे जगविण्याची जबाबदारी कोणावर होती, महापालिकेच्या अधिकाºयांनी याबाबत काय केले, याची चौकशी व्हावी. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, संतोष अट्टेलूर, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, संजय गायकवाड, योगेश मार्गम आदी उपस्थित होते. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.