सोलापूर जिल्हा परिषदेच्या निलंबित कर्मचाºयांच्या पुनर्स्थापनेबाबत आयुक्तांकडे चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 02:44 PM2018-11-29T14:44:02+5:302018-11-29T14:44:41+5:30
१६ जणांवर कारवाई: १५ कर्मचाºयांबाबत शिफारस
सोलापूर : विविध कारणाने निलंबित झालेल्या झेडपीच्या कर्मचाºयांना पुन्हा कामावर घेण्याबाबत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे मंगळवारी बैठक झाली.
या बैठकीला झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांची उपस्थिती होती. झेडपीच्या तृतीय श्रेणीच्या १६ कर्मचाºयांवर अन्वेषण चौकशी किंवा फौजदारी कारवाई झाली आहे. त्यामुळे या कर्मचाºयांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचाºयांचा निलंबनाचा एक वर्षाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे निलंबन आढावा समितीपुढे विचारार्थ त्यांची प्रकरणे ठेवण्यात आली होती. या सर्व कर्मचाºयांची विभागीय चौकशी सुरू आहे. त्यात चार जणांची चौकशी पूर्ण झाली आहे. १0 कर्मचाºयांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. यातील १५ कर्मचाºयांना पुन्हा सेवेत घेण्याबाबतचा प्रस्ताव भारुड यांनी दिला आहे.
यामध्ये लाचप्रकरणी कारवाई झालेल्या कनिष्ठ सहायक संजय बाणूर, दत्तात्रय सुतार, खंडू डोईफोडे, शामेल अडाकूल, कृषी अधिकारी बाळासाहेब बाबर, विस्तार अधिकारी विठ्ठल कोळी, कनिष्ठ अभियंता बाळासाहेब नकाते, शाखा अभियंता चिमाजी जाधवर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मल्लिकार्जुन मणुरे, ग्रामविकास अधिकारी भारत साळुंखे या अधिकाºयांचा समावेश आहे. तसेच विविध कारणाने निलंबित करण्यात आलेले कर्मचारी पुढीलप्रमाणे आहेत. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्कभंग केल्याप्रकरणी उपशिक्षक विश्वनाथ मोगल, असभ्य वर्तनप्रकरणी सदानंद पोतदार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता व परस्पर बँकेत खाते उघडल्याप्रकरणी ग्रामसेवक पांडुरंग गुंड तर अन्य कारणासाठी दत्तात्रय ढवळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. खासगी सावकारी केल्याप्रकरणी आरोग्यसेविका बेबीनंदा इचगे यांना निलंबित करण्यात आले आहे.
समिती घेणार निर्णय
विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात निलंबन आढावा समितीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीला सोलापूरबरोबरच पुणे विभागातील झेडपीचे अधिकारी उपस्थित होते. झेडपीचे सीईओ डॉ. भारुड यांनी समितीपुढे हा अहवाल सादर केला. समितीच्या शिफारशीवर आता पुढील कार्यवाही होणार आहे.