सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदासाठी माने, पाटील अन् तुषार दोशींची चर्चा
By Appasaheb.patil | Published: September 23, 2020 12:18 PM2020-09-23T12:18:44+5:302020-09-23T12:18:51+5:30
ग्रामीण पोलीस दल; मनोज पाटील शुक्रवारी नगरला जातील
सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची १७ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली़ मात्र त्यांच्या जागी कोण पोलीस अधीक्षक पदाचा भार घेणार याची सोलापूरकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, पुणे शहर पोलीस दलातील पी़ आऱ पाटील व तुषार दोशी या तिघांपैकी एका अधिकाºयाची सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधीक्षक या पदावर वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
शासनाने गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीतील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात मनोज पाटील यांची बदली अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक पदावर करण्यात आल्याचा उल्लेख होता़ मात्र सोलापूरच्या रिक्त झालेल्या अधीक्षक पदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती़ दरम्यान, बदलीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बुधवार, २३ सप्टेंबर रोजी अहमदनगरचा पदभार घेणार असल्याचे सांगितले होते.
२१ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या सोलापूर बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पाटील यांनी आपला पदभार दोन दिवस लांबणीवर टाकला होता़ दरम्यान, आता शुक्रवारनंतरच अहमदनगरचा पदभार घेणार असल्याचे सांगण्यात आले़ पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दि. १ आॅगस्ट २०१८ रोजी सोलापूरच्या ग्रामीण पोलीस दलाचा पदभार घेतला होता. दोन वर्षे ५२ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मनोज पाटील यांची अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली़ मनोज पाटील हे १८ वे पोलीस अधीक्षक होते.
तिघांनाही सोलापूरचा अनुभव
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक पदासाठी सध्या लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, पुणे शहर पोलीस दलातील पी़ आऱ पाटील, तुषार दोशी यांचीही नावे चर्चेत आहेत़ राजेंद्र माने, पी़ आऱ पाटील व तुषार दोशी या तीन अधिकाºयांनी यापूर्वी सोलापुरात विविध पदांवर आपली सेवा बजावली आहे़ या तीन अधिकाºयांना सोलापूरच्या गुन्हेगारी, राजकीय पार्श्वभूमीची माहिती आहे़