करमाळा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:27 AM2021-02-17T04:27:52+5:302021-02-17T04:27:52+5:30
बैठकीमध्ये तालुक्यातील दहीगाव उपसा सिंचन योजना व त्या अंतर्गत सुरू असलेली भूसंपादनाची कार्यवाही, कुकडी प्रकल्प व त्याअंतर्गत सुरू असलेली ...
बैठकीमध्ये तालुक्यातील दहीगाव उपसा सिंचन योजना व त्या अंतर्गत सुरू असलेली भूसंपादनाची कार्यवाही, कुकडी प्रकल्प व त्याअंतर्गत सुरू असलेली भूसंपादनाची कार्यवाही यावर सविस्तर चर्चा झाली. कोळगाव प्रकल्पांमध्ये तालुक्यातील भालेवाडी, हिवरे, मीरगव्हाण आदी गावांतील भूसंपादनाचे प्रस्ताव यावरह चर्चा होऊन ते मार्गी लावण्याची सूचना करण्यात आल्या.
उजनी धरणग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करणे याबाबत पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात स्वतंत्र बैठक झाली. प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते, यानुसार कार्यालयात जमा झालेले पर्याय जमिनींचे अर्जावर सविस्तर चर्चा करण्यात आली. भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळणे याअंतर्गत न्यायालयामध्ये प्रविष्ट असलेली प्रकरणे तसेच जेऊर ते जिंती रस्त्याचा उमरड ते मांजरगाव या भागातील रस्त्यासाठी संपादित जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही या प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.
बैठकीस उध्दव माळी, सुजित बागल ,राजेंद्र धांडे, आप्पासाहेब उबाळे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती चव्हाण, कुर्डूवाडी प्रांत अधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी अरुण गायकवाड, जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माने, सीना कोळेगाव प्रकल्प कार्यकारी अभियंता हरसुरे, दहीगाव उपसा सिंचन योजनेचे उपअभियंता सी. ए. पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : १६करमाळा-मिटींग
सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आ. संजयमामा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व अन्य अधिकारी.
---