लिंगायत समाजाच्या मागण्यांसंदर्भात प्रणिती शिंदे यांच्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:29 AM2021-02-27T04:29:10+5:302021-02-27T04:29:10+5:30
सोलापूर : अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत धर्मीयांच्या विविध मागण्यांबाबत आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी चर्चा ...
सोलापूर : अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत धर्मीयांच्या विविध मागण्यांबाबत आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी चर्चा करून समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्या, लिंगायत धर्माला शासनस्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्या, २०२१ मध्ये होणाऱ्या भारताच्या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची परिपत्रकांमध्ये वेगळा कॉलम देऊन लिंगायत धर्माची स्वतंत्र जनगणना करावी, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, मंगळवेढा तालुका येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकाची उभारणी तत्काळ करा, लिंगायत धर्माच्या मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्याला मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी शासनाने स्वतंत्र मंडळाची किंवा प्रकल्पाची निर्मिती करावी, महात्मा बसवेश्वर जयंतीदिवशी शासनाकडून शासकीय सुटी जाहीर करा, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये महात्मा बसवेश्वर व शिवयोगी सिद्धरामेश्वर अध्यासन केंद्र सुरू करा, महाराष्ट्रात गाव तेथे अनुभव मंटप (समाजमंदिर), गाव तेथे रुद्रभूमी (दफनभूमी) अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावर आमदार शिंदे यांनी लिंगायत धर्मीयांच्या मागण्यांसंदर्भात सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.
याप्रसंगी शहर अध्यक्ष सकलेश बाभूळगावकर, धोंडप्पा तोरणगी, सिद्धराम बोळीगार, शिवलिंग अचलेरे, नागेश पडणुरे, सिद्धाराम प्याडशिंगे, खंडेराव कामशेट्टी, बसवराज चाकाई उपस्थित होते.