बार्शी तालुक्यात रानगव्याची चर्चा; पहिल्यांदाच दिसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:44+5:302021-07-31T04:23:44+5:30
एरव्ही कळपाने राहणारा हा प्राणी एकटाच दिसत असल्याने वाट चुकून आला असण्याची शक्यता आहे. सध्या वनविभाग कॅमेरे आणि पेट्रोलिंग ...
एरव्ही कळपाने राहणारा हा प्राणी एकटाच दिसत असल्याने वाट चुकून आला असण्याची शक्यता आहे. सध्या वनविभाग कॅमेरे आणि पेट्रोलिंग करुन त्याचा शोध घेत आहेत. बार्शी तालुक्यात रानगवा पहिल्यांदाच दिसला असून बुधवारी दुपारी रस्तापूरमधील शेतकरी नागनाथ नवनाथ बरबडे यांना सर्वप्रथम गवा आढळून आला. त्यानंतर गुरुवारी साकत परिसरामध्ये आढळला आहे. गवा शाकाहारी प्राणी असून भारतीय पशुंच्या मानाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे. हत्ती, गेंडा, पाणघोडा व जिराफ या प्राण्यांच्या खालोखाल गवा हा सर्वांत वजनदार भूचर प्राणी आहे. त्याचा एकसारखा पाठलाग केला किंवा तो जखमी झाला, तर तो चिडून क्रूर बनतो.
---
बुजरा आणि भित्रा असलेला गवा ग्रामस्थांसाठी त्रासदायक नाही. त्यामुळे कोणीही घाबरून न जाता त्याच्या अधिवासामध्ये परत पाठविण्यासाठी मदत करावी. कुणीही त्याची छेड काढू नये.
-धैर्यशील पाटील, वन उपसवंरक्षक, सोलापूर
---
आम्ही सर्वजण गव्याच्या मागावर आहोत, तो जसा आला तसाच परत त्याच्या आदिवासात कसा जाईल याकडे आमचा कल आहे.
-इरफान काझी, वनपाल, वैराग
----
फोटो : ३० पानगवा