दुरंगी का तिरंगी शहरभर झडू लागल्या चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:28 AM2021-08-25T04:28:05+5:302021-08-25T04:28:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुर्डूवाडी : राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातील प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना नुकत्याच ...

Discussions about why Durangi and Tirangi started sweeping across the city | दुरंगी का तिरंगी शहरभर झडू लागल्या चर्चा

दुरंगी का तिरंगी शहरभर झडू लागल्या चर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कुर्डूवाडी : राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातील प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना नुकत्याच दिल्या आहेत. त्यामुळे कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सारेच सक्रिय होऊ लागले आहेत. शिवसेनेचा डिकोळे गट, विद्यमान आमदार संजयमामांचा स्थानिक गट, रिपाइं आणि असंतुष्ट बंडखोर गटांनी चाचपणी सुरू केली आहे. यंदाची निवडणूक दुरंगी की तिरंगी अशा चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत.

कुर्डूवाडी नगरपरिषदेवर १९९२ पासून अपवादवगळता शिवसेनेची आतापर्यंत सत्ता आहे. येथील नगरपरिषद निवडणूक शेवटपर्यंत कोणालाही कळत नाही. सध्या शहरांमध्ये जे शिवसेनेच्या विरोधात आहेत त्यातील अनेकांनी यापूर्वीच सेनेत जाऊन सत्ता उपभोगली आहे. सत्ताधारी गटाविरुद्ध सर्व विराेधक आतापासूनच सक्रिय झाल्यामुळे येणारी निवडणूक ही कोणत्याच गटाला सोपी जाणार नाही असे दिसून येत आहे. येथील निवडणुकीत कोण-कोणाशी आघाडी करेल व कुठला नेता कुठे जाईल याबाबत शेवटपर्यंत सांगता येत नाही. सध्यातरी शहरातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता आहे.

येथील नगरपरिषदमध्ये एकूण १७ जागा आहेत. गेल्यावेळी जनतेतून शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडला गेला. निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेच्या गटाला प्रत्यक्षात ९ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या विराेधात एकत्रपणे लढलेल्या आमदार संजयमामा शिंदे यांच्या स्वाभिमानी पक्षाच्या पॅनेलला ४ तर रिपाइंला ४ अशा जागा मिळाल्या होत्या. त्या निवडणुकीनंतर मात्र आठच दिवसांत शहरात झालेल्या पैगंबर जयंतीच्या रॅलीला संजयमामा शिंदे यांनी येऊन झेंडा दाखविला आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यातला मतभेदच कमी केला तेव्हापासून आतापर्यंत येथील नगरपरिषदेत सत्ताधारी व विरोधक अगदी गुण्या-गोविंदाने मैत्रीत राहत आहेत. अनेक कामेही त्यांनी मिळून-मिसळून केली आहेत.

----

कोण कोणती भूमिका घेणावर यावर समीकरणे

सध्या तरी शिवसेनेची उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांतून सर्वांत जास्त स्पर्धा निर्माण झाली असल्याचे दिसत आहे. येथे शिवसेनेचेही तीन गट आहेत. त्यात शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, शहर शिवसेना प्रमुख समाधान दास व शहर युवासेना प्रमुख यांच्या गटाचा समावेश आहे. त्यामुळे हे सर्वजण भविष्यात एकत्र लढणार की, स्वतंत्र यावरही येथील काही जागांचे भविष्य अवलंबून आहे तर शिवसेनेच्या विरोधात असलेले आ. शिंदे गटाचे समर्थक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, रिपाइं पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे येथील रणनीती ठरणार आहे.

-----

Web Title: Discussions about why Durangi and Tirangi started sweeping across the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.