महिलेशी लज्जास्पद वर्तन; गॅरेजवाल्याविरुद्ध गुन्हा दाखल
By विलास जळकोटकर | Published: January 27, 2024 06:13 PM2024-01-27T18:13:35+5:302024-01-27T18:14:00+5:30
सोलापूर-पुणे हायवेवर पिडिता कँटीन चालवून आपला उदरनिर्वाह चालवते.
सोलापूर: कँटीन चालवणाऱ्या महिलेशी लजास्पद वर्तन करुन अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी गॅरेचालकासह दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला आहे. पिडितेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास सोलापूर-पुणे हायवेवर ही घटना घडली. सलीम शेख व त्याचा मुलगा असे गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे की, सोलापूर-पुणे हायवेवर पिडिता कँटीन चालवून आपला उदरनिर्वाह चालवते. कॅटीनर येणाऱ्या वरील आरोपीने तिच्याशी हात पिरगाळून लज्जास्पद वर्तन केले. शिवीगाळ करुन तुम्हाला येथे कँटीन चालवू देणार नाही अशी शिवीगाळ पिडिता व तिच्या नवऱ्यास केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भा. द. वि. ३५४, ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा नोंदला आहे. तपास सहाय्यक पोलीस आयुक्त करीत आहेत.