हाच खरा महाराष्ट्रधर्म ! डिसले गुरुजींच्या दातृत्वामुळे महाराष्ट्राची मान उंचावली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 11:17 AM2020-12-09T11:17:56+5:302020-12-09T11:19:21+5:30
मुंबई येथे सोलापूर जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचा व त्यांच्या माता-पित्यांचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते.
सोलापूर - युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाउंडेशन कडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. या यशामुळे तुमचा तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले. तसेच, पुरस्कारप्राप्ती नंतर डिसले गुरुजींनी मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं, त्यांनी दाखवलेल्या ह्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. हा खरा महाराष्ट्रधर्म!, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. सोलापूरच्या शिक्षकाचा राजदरबारी सन्मान झाल्याने सोलापूरकरांचीही मान उंचावली आहे.
मुंबई येथे सोलापूर जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचा व त्यांच्या माता-पित्यांचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे प्रदेश सरचिटणिस दिलिप धोत्रे, अविनाश अभ्यंकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, हरिभाऊ जाधव, प्रविण देशमूख, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी डिसले कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. शिवाय डिसले गुरुजींच्या पुढील शैक्षणिक कार्यात आवश्यक तेथे मदत करण्याचे अभिवचन दिले. उपस्थित सर्वच मान्यवरांनी डिसले गुरुजींनी केलेल्या कार्याचे कौतूक करुन त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.
पुरस्कारप्राप्ती नंतर डिसले गुरुजींनी मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं, त्यांनी दाखवलेल्या ह्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. हा खरा महाराष्ट्रधर्म! #महाराष्ट्रधर्मpic.twitter.com/vExcMOrmoe
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 8, 2020